सोयगाव,ता.४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगावसह तालुक्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या भरपाईचे अर्ज भरतांना मात्र शेतकऱ्यांची चांगलीच ग्रामीण भागात तारांबळ उडाली असतांना ,दुसरीकडे मात्र पथक पंचनाम्यासाठी शेतावर जात असल्याने पंचनामा करावा कि अर्ज भरावा या संभ्रमात शेतकरी सापडल्याने सोयगावला दोन्ही कार्यालयांमध्ये गोंधळ उडाला आहे,कृषी आणि तहसील कार्यालयात मात्र शेतकऱ्यांची गर्दी पहावयास मिळत आहे.
अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश जिल्हा प्रशासनाने सोयगावला काढले आहे,त्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पथक शेतावर जात असतांना शेतकऱ्यांना मात्र शासकीय मदत आणि विमादावे भरण्यासाठी दोन प्रकारच्या अर्जांनी संभ्रमात टाकले असून विमादावे दाखल करतांना पिकांच्या नुकसानीचा फोटोही आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले असतांना मात्र शेतकऱ्यांना कोणताही विभाग मार्गदर्शन करत नसल्याने अवकाळी नंतर सोयगावला गोंधळाचा पावूस पडत आहे.दरम्यान गोंधळात पडलेल्या शेतकऱ्यांची तहसील आणि कृषी कार्यालयावर मोठी गर्दी होत असतांना दुसरीकडे पंचनाम्याचे पथक शेतावर जावून धडकल्याने शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झालेली आहे.
तूर पिकांना वगळल्याची ओरड-
अतिवृष्टीच्या मदतीतून तूर पिकांना वगळल्याची ओरड सोमवारी शेतकऱ्यांनी केली असल्याने यावर मात्र पंचनामा पथकांनी मौन बाळगले असून याबाबत तहसीलदार प्रवीण पांडे यांनी स्पष्टीकरण देतांना सांगितले कि अतिवेरुष्टीच्या नुकसानीचे सोयगावला दोन निकष ग्राह्य धरण्यात आलेले असून विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्�