सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―तालुक्यातील फर्दापुर सोयगाव मार्गावरील फर्दापुर तांडा येथे श्री १०८ सिद्धचक्र महामण्डल विधान विश्वशांती महायज्ञ समारोहाचे दी.४ (सोमवार) नोव्हेबर ते ११ (सोमवार) नोव्हेबर पर्यन्त आयोजन करण्यात आले आहे.
परमपूज्य श्री १०८ कल्पवृक्ष नंदिनी महाराज यांच्या प्रेरनेणे व मुनिश्री बाहुबली सागरजी महाराज यांच्या सनिध्याने कल्पवृक्ष कलशाकार फर्दापुर तांडा येथे श्री १०८ सिद्धचक्र महामण्डल विधान विश्वशांती महायज्ञ समारोहाचे दी.४ (सोमवार) नोव्हेबर ते ११ (सोमवार) नोव्हेबर पर्यन्त आयोजित करण्यात आला आहे.
अशी आख्यायिका आहे की हजोरो वर्षापूर्वी महासती मैनासुंदरीने आपल्या पतीचा (श्रीपालजी) कृष्ठरोग बरा व्हावा यासाठी आठ दिवस विधानपूजा व महायज्ञ केला होता.त्यामुळे श्रीपालजी व सातशे कृष्ठरोगी आजारातून बरे झांले होते. अश्या प्रकारची विधानपूजा केल्याने विविध आजार,दुःख, भूत पिशाच,यापासुन मुक्ति मिळून व्यापार तसेच संपत्ति मिळते. त्यामुळे या विधान पुजेचे अनन्य साधारण महत्व आसल्याचे प.पु.आचार्य कल्पवृक्ष नंदीजी महाराज यांनी सांगितले.
हा विधान पूजा व विश्वशांति महायज्ञ कार्यक्रम प.पु.बाहुबली सागरजी महाराज, तीर्थनीदेशिका सपनादीदी, विमलादीदी,कुसुमदीदी यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित वर्धमान शास्त्री अंधेरी मुंबई, धर्मप्रेमी महानुभव जया अनिल बंडी विलेपार्ले मुंबई व विनोदनी पाटनी करीत आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी अनिल बंडी, अशोक हुमड़,संच्चालाल जैन (काकाजी),सुनील जैन, शेखर जैन, मनोज छाबड़ा, महेंद्र खींवसरा,सुदर्शन जैन, सतीश साखरे,अनिल लुहाड़िया, संदीप पाटनी,संजय पांडे,हे विशेष परिश्रम घेत आहेत.
फाटो ओळ :- सोयगाव १) परमपूज्य श्री १०८ कल्पवृक्ष नंदिनी महाराज २) फर्दापुर तांडा येथे श्री १०८ सिद्धचक्र महामण्डल विधान विश्वशांती महायज्ञ समारोहात विधान पूजा करतांना भाविक.