औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणविशेष बातमी

अयोध्या निकालाच्या पार्श्वूमीवर शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी शांतता राखावी―भारतीय कम्युनिस्ट पक्ष

औरंगाबाद :आठवडा विशेष टीम―आपल्या देशातील संवेदनशील विषय असलेला अयोध्या प्रकरणी कोर्टात न्याय प्रक्रिया पूर्ण झाली आहे . कधीही न्यायालयाचा निकाल येऊ शकतो. त्यामुळे औंरगाबादकरांनी शांतता आणि जातीय सलोखा पाळावा असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केले आहे.
याबाबत असे की अयोध्या सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला आहे. संदरील राखुन ठेवलेला निकाल काहि दिवसांत जाहिर करण्यात येणार आहे . देशातील बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, शिक्षणाचे बाजारीकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, ई वरून लक्ष हटवण्यासाठी अयोध्या प्रकरणाचा वापर कायम करण्यात आला. न्यायालयाचा निकाल आल्या नंतरही देशात अशांतता पसरवणाऱ्या शक्ती पुन्हा त्याचा गैरफायदा घन्याचीे शक्यता आहे. शहरातील नागरिकांनी शांतता, सयम कायम ठेवावी हे नम्र आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षा ने केले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नये, पोलिसांनीही कोणताही भेदभाव न करता वेळप्रसगी कडक कारवाई करावी असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. या प्रसिद्धी पत्रकावर डॉ भालचंद्र कांगो, कॉ मनोहर टाकसाळ,कॉ. राम बाहेती, कॉ अश्फाक सलामी, कॉ अभय टाकसाळ, कॉ कैलास कांबळे, कॉ गणेश कसबे, कॉ अशोक जाधव, कॉ बाबुराव पठाडे, कॉ गुलाम महंमद, कॉ भास्कर लहाने, कॉ महेबुब कुरैशी, कॉ मधुकर खिल्लारे, कॉ विकास गायकवाड, कॉ तारा बनसोडे, कॉ मनीषा भोळे, कॉ अनीता हिवराळे, कॉ सुभाष साबळे, कॉ प्रकाश बनसोडे, कॉ आय्यास शेख, कॉ सुभाष गायकवाड, कॉ मिलिंद काकडे, कॉ आतिष गवळे, ईत्यादींच्या सह्या आहेत.