औरंगाबाद जिल्हाशेतीविषयकसोयगाव तालुका

सोयगाव: सरसगट पंचनामे करून शंभर टक्के पिकविमा द्या,स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगावसह तालुक्यात अतिवृष्टीने खरिपाच्या पिकांची माती झालेली असून शेतकऱ्यांना विमादावे करण्यासाठी व नुकसानीचे अर्ज भरण्यासाठी वेठीस न धरता सरसगट पंचनामे करावे व शंभर टक्के पिकविम्याचा लाभ मिळवून द्यावा या मागणीसाठी मंगळवारी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने सोयगाव तहसील कार्यालयावर मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले.नायब तहसीलदार सतीश देशमुख यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे,सोयगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या विळख्यात जवळपास सर्वच पिके सापडली आहे.त्यामुळे मका,ज्वारी,कपाशी,सोयाबीन,आणि बाजरी आदी पिके हातातून गेली आहे.कपाशी पिकांच्या वेचण्या ठप्प झाल्या असून अति पावसात लागलेला कापूस गळून पडला आहे.नुकसानीची तीव्रता गम्बीर असून या नुकसानीचा मावेजा पदरात मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस न धरता सरसगट पंचनामे करून शंभर टक्के पिक विमा मंजूर करावा या मागण्यासाठी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले यावेळी स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल बोरसे,भाजपा तालुका उपाध्यक्ष समाधान सूर्यवंशी,पंकज महालपुरे,शशिकांत गरुड,ज्ञानेश्वर निकम,पप्पू नेरपगार,वाल्मिक गरुड,विजय नगरे,भूषण महालपुरे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.