बीड जिल्हा

बीड नगरपरिषदेच्या विशेष लेखापरीक्षण बाबत स्थानिक निधी लेखापरीक्षा विभाग बीड चे सह संचालक श्री सोळंके यांची भूमिका संशयास्पद

बीड: बीड नगर परिषदेमध्ये मागील कालखंडात शासनाकडून बीड शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी व त्यांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी असणाऱ्या अनेक योजना मध्ये व आलेल्या निधी मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झालेला आहे सदर बाबी बाबत तात्कालीन लेखापरीक्षण नगर परिषद बीड यांनी आपल्या लेखापरीक्षण अहवालात गंभीर शेरे व ताशेरे ओढले होते बीड नगर परिषदेच्या एकंदरीत एक हाती सत्ते बाबत कारभाराबाबत व झालेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत अनेक वेळा शासन व प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या परंतु सदरील तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही सत्तेच्या पैशांच्या जोरामुळे होत नव्हती त्यामुळे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका सन 2016 मध्ये दाखल करण्यात आलेली होती उपरोक्त दाखल याचिकेमध्ये बीड नगर परिषदेच्या एकूण कारभारामध्ये झालेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार पुराव्यासह मान्य न्यायालयाकडे सादर करण्यात आलेला होता सदर प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने अनेक सुनावण्या घेऊन त्याबाबत आदेश पारित करून तीन आठवड्याच्या आत बीड नगरपरिषदेने सन 2010 11 ते सन 2013 14 या आर्थिक वर्षातील संपूर्ण अभिलेखे कागदपत्रे अनुषंगीक माहिती विशेष लेखापरीक्षण करणाऱ्या यंत्रणेस पुरवण्याचे आदेश देण्यात आलेले होते परंतु सदरील आदेशाची बीड नगर परिषदेने व स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाने दखल न घेता वेळकाढूपणा अवलंबलेला आहे सदरील आदेशामध्ये विशेष लेखापरीक्षण करण्यासाठी कालमर्यादा माननीय न्यायालयाने ठरवून दिलेली असतानासुद्धा जाणून-बुजून स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाने दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे बीड स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहसंचालक श्री सोळंके यांनी बीड नगर परिषदेचे लेखापरीक्षण केलेले आहे आणि सध्या सुरू असलेल्या विशेष लेखापरीक्षण पथकामध्ये स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग औरंगाबाद येथील श्री कोटगिरे हे वगळता बाकी सर्व अधिकारी व कर्मचारी स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग बीड येथील असल्याचे आढळून आलेले आहे मागील आपणच केलेल्या लेखापरीक्षणचे विशेष लेखापरीक्षण स्थानिक कर्मचारी पारदर्शकपणे करतील का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे मागील झालेल्या लेखा परीक्षणामध्ये स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग बीड या कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या गंगेमध्ये आपले हात ओले करून घेतल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये होत असताना त्यात स्थानिक कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्याकडून विशेष लेखापरीक्षणाचे काम का करून घेतले जात आहे याबाबतची शंका निर्माण होत आहे विशेष लेखापरीक्षण पारदर्शकपणे न करण्यासाठी विशेष लेखापरीक्षण पथक वरून मॅनेज आणण्याची बीड नगर परिषदेच्या एकूण कारभारामध्ये झालेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार दडपण्यासाठी व भ्रष्टाचार्‍यांना मदत करण्यासाठी स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग बीडचे सहसंचालक श्री सोळंके हे विशेष प्रयत्न करीत असल्याचे चर्चा सुरू आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदरील विशेष लेखापरीक्षण होत असल्याने व सदरील याचिकेमध्ये याचिकाकर्ता असल्याने बीड नगर परिषद येथे विशेष लेखापरीक्षण पथकास भेट दिल्यानंतर विशेष लेखापरीक्षण पथकाच्या लोकांनी आपले साधे नावही सांगण्यास नकार दिला आहे व आम्ही आमच्या मनमर्जी प्रमाणे विशेष लेखापरीक्षणाचे काम करून घेऊ अशी स्वरूपाची भाषा वापरली आहे त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीड नगर परिषदेमध्ये झालेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार विशेष लेखा परिक्षणाच्या माध्यमातून समोर येणार होता परंतु कर्मचाऱ्यांच्या व प्रशासनाच्या कृपा आशीर्वादामुळे व आर्थिक देवाण-घेवाण मुळे पारदर्शक होणार का याबाबत मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.