औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीसामाजिक

औरंगाबाद: उपोषणाकडे जाणिकपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या धुत बंधुच्या बंगल्यावर उद्या कामगारांचा मोर्चा धडकणार

औरंगाबाद :आठवडा विशेष टीम― अ‍ॅटोकार्स (व्हिडिओकॉन ग्रुप) च्या कामगारांचा गेल्या 71 दिवसांपासूनच्या उपोषणाकडे जाणिकपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या धुत बंधुच्या बंगल्यावर दिनांक 7.11.2019 रोजी कामगारांचा मोर्चा धडकणार आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    58730/- कोटी रुपयांचे कर्ज 50 बँकाकडून घेऊन कर्ज बुडवले. धुत बंधूंना अद्यापही अटक करण्यात आली नाही. जनतेची हजारो कोटींची ही रक्कम वसुल करा, धुत बंधु यांनी राजकारणी व प्रशासनाशी संगणमत करून बँक वर दरोडा टाकण्याचा गुन्हा दाखल करा, गेल्या वर्षभराचा कामगारांचा थकीत पगार द्या, या मागणीसाठी 340 कामगार गेल्या 71 दिवसांपासून सहायक कामगार उपायुक्त यांच्या कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत. त्यांनी यापूर्वी भिक मांगो आंदोलन करून धुत बंधुंना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या मार्फत 721/- रुपये पाठविले होते. कामगार उपाशी असतांना धुत बंधू बंगल्यात एैशआरामात आहेत. ते शिवसेनेचे खासदार आहेत. शिवसेनेला धुत बंधूंचा हा बँक दरोडा आणि कामगारांना उपाशी ठेवणे मान्य आहे का?,
    या कामगारांमध्ये हिंदु, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्‍चन जाती धर्माचे कामगार आहेत. धुत बंधू करीत असलेल्या छळाला शिवसेनेचा पाठिंबा आहे का? असा प्रश्‍न ही आम्ही उपस्थित करीत आहोत. त्यामुळे दि.7.11.2019 रोजी कामगारांचे वेतन बुडविणार्‍या व बँकेवर दरोडा टाकणार्‍या धुत बंधुंच्या विरोधात त्यांच्या रेल्वे स्टेशनच्या बंगल्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलीसांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍या कामगारांचा मोर्चा परवानगीचा अर्ज आवक-जावक विभागतही घेतला नाही.
    कदाचित दरोडा टाकणार्‍या धूत बंधूंना संरक्षण आणि शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍यांना शिक्षा देण्याचा पोलिसांचा हेतू असू शकतो. कदाचित शांततेत चाललेले आंदोलन ही पोलिसांना मान्य नसावे. या पत्रकार परिषदेद्वारे आम्ही लोकशाही अधिकाराची गळचेपी करू नका असे आवाहन पोलिसांना करीत आहोत. येणार्‍या काळात शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवुन धुत बंधुंवर कार्यवाही करून कामगारांचे थकीत वेतन देण्याची मागणी ही केली जाणार आहे. हिंदु, मुस्लिम प्रश्‍नांत जातीने लक्ष घालणार्‍या शिवसेना भाजपला 71 दिवसांच्या या उपोषणाकडे फिरकावयास वेळ मिळाला नाही, हे देखील सुचक संकेत आहे.
    शिवसेनेसहीत भाजप, काँग्रेसलाही धूत बंधुंनी नेहमी निवडणुकीत फंड दिलेला आहे. धूत हे खासदार असल्याने व आज पर्यंत वित्तभांडवलाच्या अनेक केेंद्रीय समित्यांवर असल्याने कर्ज कसे बुडवायचे आणि कसे पचवायचे हे त्यांना चांगले माहित आहे. शेतकर्‍यांने पन्नास हजारांचे कर्ज थकविले तर त्याला आत्महत्या करेपर्यंत त्रास देतात आणि धूत सारख्या लुटारु भांडवलदारांना संरक्षण हा दुपट्टीपणा उघड करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. ओला दुष्काळ असताना शेतकर्‍यांना बँकांनी वसुलीच्या नोटीसी दिल्या त्या शिवसेनेने जाळल्या. खरे तर बँक अधिकारी हे सरकारच्या आदेशाने काम करतात. असे असताना मोदी सरकारचा राग शिवसेनेने सोईने बँक अधिकारी व बँकेलाच जाळतो अशा पद्धतीने काढला. ज्या सोईने शेतकर्‍यांसाठी बँकेच्या विरोधात शिवसेना आली तसेच त्यांच्या स्वतःच्या खासदाराला ही 58730/- कोटींचे कर्ज बँक जमा करावयास व कामगारांचा पगार द्यायला ही शिवसेनेने सांगावे.