औरंगाबाद जिल्हाशेतीविषयकसोयगाव तालुका

सोयगाव: बुडालेल्या खरिपाच्या कपाशीला मशागत करण्यासाठी पावले उचलली,घोसला येथील शेतकऱ्याची व्यथा,तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे

सोयगाव,दि.६: ज्ञानेश्वर धोंडू पाटील―मागील वर्षीच्या हंगामात आलेला दीडशे क्विंटलच्या वर कापूस आणि मात्र या वर्षी कपाशी पिके जोमात असतांना प्रकाशाचा सन म्हणून ओळख असलेल्या दिवाळी सणाला पणती लावण्याइतपत कापूस घरात न आल्याने अतिवृष्टीत सारेच हिरवाल्याची भावना घोसला ता.सोयगाव येथील बाधित शेतकऱ्याने डोळ्यांना पाणावून सांगितले.दरम्यान लागवडीचा खर्च आणि बँकेकडून काढलेले कर्ज फेडण्याची मात्र या शेतकऱ्याला कायम खुणावत आहे.
सोयगाव तालुक्यात ऐन दिवाळीच्या सणात अतिवृष्टीने पिकांना गंभीर केले तालुकाभर शेतकऱ्यांची व्यथा व करूण कहाणी असतांना घोसला ता.सोयगाव येथील श्रावण युवरे पाटील या ५५ वर्षीय शेतकऱ्याला मात्र ३२ एकर क्षेत्रातील कापूस पिकांचे झालेले नुकसान दररोज वेदना देत आहेत.या शेतकऱ्याच्या डोळ्यांची मात्र झोप कायमची उडाली आहे,कापूस वेचानीचा हंगाम असल्याने या शेतकऱ्याचे पावले अजूनही बाधित झालेल्या कपाशीचं शेताकडे वळत असून पाण्यात आलेल्या खरिपाच्या हंगामासः कपाशीचे बोंडे कशी पदरात पडतील हीच विवंचना या शेतकऱ्याला लागून आहे.नेहमीची सवय आणि डोळ्यापुढे दिसत असलेले नुकसान यामुळे या बहुभूधारक शेतकऱ्याचे डोळे मात्र पाणावल्या शिवाय राहत नाहीये,दररोज नुकसान पाहून शेतात रडणे हाच या शेतकऱ्याचा नित्यक्रम झालेला आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.