औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

औरंगाबाद: सोयगाव येथे शांतता कमिटीची बैठक पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―अयोध्या येथील रामजन्मभूमी बाबरी मस्जिद वादप्रकरणाचा निकाल (ता.९)सुप्रिम कोर्ट देणार आहे.निकाल कोणत्याही बाजूने लागो जनतेने शांताता राखा सामाजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य किंवा सोशल मीडिया वर पोस्ट व्हायरल करू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी केले.
सोयगाव येथील पंचायत समिती बचत भवन सभागृहात तालुकास्तरीय शांताता कमिटीची बैठक घेण्यात आली.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी
सुदर्शन मुंडे, तहसिलदार प्रवीण पांडे , पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे ,फौजदार शिरसाट , नायब तहसिलदार देशमुख , शैख , पोलीस कर्मचारी विकास लोखंडे , यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी अयोध्या येथील रामजन्मभूमी बाबरी मस्जिद वादप्रकऱणाचा निकाल लागल्यानंतर कोणीही जल्लोष करू नये , मिरवणूक काढू नये , जमावाने एकत्र येऊ नये , सोशल मीडिया वर वादग्रस्त पोस्ट व्हायरल करू नये असं कुणी करीत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा आपल्या गावांत , तालुक्यात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण ही समाजातील प्रत्येक व्यक्तीची असल्याचे सांगून शांतता राखून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, तहसिलदार प्रवीण पांडे , पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी केले.नगरसेवक एकनाथ महाजन,खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन रामभाऊ पठाडे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनिल गुजर ,करीम देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.आभार फौजदार शिरसाट यांनी मानले.विविध पक्षांचे पदाधिकारी , सरपंच , पोलीस पाटील ,इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.