औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

औरंगाबाद: सोयगाव तालुक्यातील सोयगाव,बनोटी मंडळात शेतकऱ्यांसाठी संवाद उपक्रम,महसूल आणि कृषी विभागाने संयुक्त भेटी

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―अतिवृष्टीच्या तडाख्यात नुकसान झालेल्या खरिपाच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत मंगळवारी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सोयगाव,बनोटी मंडळात शेतकरी संवाद उपक्रम राबवून नुकसानीबाबत पाहणी व शेतकऱ्यांना धीर देण्याचा उपक्रम हाती घेतला होता.यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे यांचेसह तालुका पथक मंडळातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून भिडले व नुकसानी बाबत थेट बांधावर चर्चा करून पिकविमा भरलेल्य व पिक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत करावयाच्या अर्जाबाबत बांधावर मार्गदर्शन केले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    सोयगाव मंडळातील सोयगाव,कंकराळा,जरंडी,रामपुरा,निंबायती,बहुलखेडा ,कवली ,बनोटी मंडळातील घोसला , निमखेडी ,उमरविहीरे , वरठाण ,बनोटी ,आदी गावात संवाद उपक्रम राबवीत शेतकऱ्यांना धीर देत नुकसानीबाबत निराशा न बाळगता शासन तुमच्या पाठीशी असल्याचे सांगून अर्ज करावयाच्या पद्धतीत अमुलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांना नुकसानीबाबत अर्ज भरण्याची प्रक्रिया आणखीन सुलभ करून दिली,यावेळी शेतीनिष्ठ शेतकरी रवींद्र पाटील,दिलीप पाटील,मधुकर पाटील,सरपंच समाधान तायडे,राजेंद्र चौधरी,विजय कारगिल,सुधीर पाटील,तालुका कृषी अधिकारी सुदाम घुले,अरविंद टाकणकर,अजय राजपूत,पंडित तेली,डॉ.उल्हास पाटील आदि शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.