सोयगाव: बेवारस पंचनामे गठ्ठे आढळल्याने सोयगावात खळबळ

सोयगाव,दि.७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―अवकाळी पावसाच्या फटक्यात तालुका प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून गुरुवारी मात्र शासकीय पंचनाम्यांचा उल्लेख असलेल्या अर्जांचा खच बेवारस अवस्थेत सोयगावला पडलेला आढळला.याबाबत चौकशी केली असता,संबंधित पंचनामा पथक पंचनामा आढावा बैठकीला आले असल्याची माहिती हाती आली असून मात्र या पथकांनी हे अर्ज बेवारस स्थितीत का ठेवले असाही प्रश्न उपस्थित झाला होता,याप्रकारामुळे सोयगावात खळबळ उडाली होती.
सोयगाव तालुक्यात एकीकडे झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात शेती पिकांची माती झाली असतांना,दुसरीकडे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तालुक्यात शेतकऱ्यांची मोठी धडपड चालू असतांना पंचनाम्यांच्या अर्जाला मात्र संबंधित कर्मचारी बेवारस स्थितीत फेकून देत आहेत.हा प्रकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्यासारखा आहे.आधीच झालेले नुकसान आणि त्यात मदत मिळण्यासाठी करावी लागणारी कसरत यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

पंचायत समितीच्या बचत भुवन सभागृहाच्या प्रवेश द्वाराजवळ हे आढळून आलेले गठ्ठे मात्र कृषी विभागाच्या पथकांचे असल्याचे वृत्त हाती आले असून सायंकाळी मात्र या ठिकाणावरील गठ्ठे सोयीस्करपणे उचलून घेण्यात आले आहे.त्यामुळे सदरील पंचनामे अर्ज हे अस्वीकृत होते का किंवा या अर्जांमध्ये चुका होत्या का याबाबत मात्र कोणताही खुलासा मिळालेला नव्हता.मात्र शासकीय मदतीचे हे अर्ज असल्याचा उल्लेख मात्र यावर पहावयास मिळाला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.