परळी:आठवडा विशेष टीम― शेतकऱ्याच्या शेतातील पिके फळबागा भाजीपाला इत्यादी हाती आली असता अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे याप्रसंगी केंद्र व राज्य सरकारांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी एन डी डी आर एफ या निकषावर मदत न करता नियमात बदल करून प्रति हेक्टर 1 लाख रुपये मदत करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी मुख्यमंत्री मुख्य सचिव प्रधान सचिव यांना निवेदनाच्या द्वारे मागणी केली आहे संपूर्ण खरीप पिके गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती खूप मोठे आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे रब्बी पिके घेण्यासाठी शासनाने खते बियाणे औषधे मोफत उपलब्ध करून आर्थिक मदत करण्याची मागणी केली असून पीक विमा संदर्भात शासनाच्या धोरणानुसार तीन वर्षांची सरासरी आनेवारी ग्राह्य धरली जाते व पिकाच्या उंबरठा उत्पन्न द्वारे सीमा निश्चित केली जातो या नियमास बगल देऊन 100% शेतकऱ्यांचे पीक अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नष्ट झाले आहे त्यामुळे सरकारने तात्काळ शेतकऱ्यांनी स्वतःची गुंतवणूक करून स्वतःच्या पिकाचा विमा उतरलेला आहे.
त्यामुळे नियमाचे वाट न पाहता शेतकऱ्यांना तात्काळ विम्याचे पैसे शासन स्तरावर आर्थिक निकष व अनेक नियमावलीमध्ये शेतकऱ्यांना गुरफटून न जाऊ देता खास बाब म्हणून निकष शिथिल करून खरीप पिकांचे कर्ज लाईट बिल मुलांची शैक्षणिक फी माफ करून रब्बीसाठी खते बी-बियाणे औषधी व आर्थिक मदत तात्काळ देण्याची मागणी दिनांक 6 नोव्हेंबर 2019 ला निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे वसंतराव मुंडे चेअरमन श्रम व रोजगार नाशिक विभागाचे यांनी केली आहे.