जे योग्य व चांगले वाटेल तेच कार्य आपण करायला पाहिजे लोक काय बोलतील या कडे लक्ष देवू नका चांगल्या व सामाजिक कार्यासाठी कधीही मागे येऊ नका― आचार्य कल्पवृक्षनंदी महाराज

कल्पवृक्ष तिर्थक्षेत्र फर्दापूरतांडा येथे विश्वशांती महायज्ञ संपन्न

सोयगाव:आठवडा विशेष टीम―जे योग्य व चांगले वाटेल तेच कार्य आपण करायला पाहिजे लोक काय बोलतील या कडे लक्ष देवू नका चांगल्या व सामाजिक कार्यासाठी कधीही मागे येऊ नका असे प्रतिपादन आचार्य श्री कल्पवृक्ष नंदीजी महाराज यांनी केले ते सोमवारी (दी.११) रोजी दिगंबर जैन कल्पवृक्ष कलशाकार तीर्थक्षेत्रे फर्दापूरतांडा (ता.सोयगाव) येथे विश्वशांती महायज्ञ,पिछी परीवर्तन व श्री १०८ सिध्दचक्र महामंडल विधान समारोहातव्यक्त केले.
त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनात आचार्य श्री कल्पवृक्षनंदीजी महाराज पुढे म्हटले की आजच्या भौतिक जीवनात व सुखसोयी जीवनशैलीत मनूष्य त्यागभाव विसरला आहे. त्यामुळे मनुष्य प्राणी दुखी होत चालला आहे.खरी सुखशांती हवी असेल तर भगवंत व अध्यात्मा कडे वळा, दान धर्म करा,तसेच दिनदुबळ्यांची सेवा करा असेही यावेळी आचार्य कल्पवृक्ष नंदीजी महाराज यांनी उपस्थित समुदायास प्रतिपादन केले.
दिगंबर जैन कल्पवृक्ष कल्शाकार तीर्थक्षेत्र फर्दापूरतांडा येथे दि.४ नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या विश्वशांती महायज्ञ सोहळ्यात पार्श्वनाथ यक्षधिणी प्रतिष्ठा संसकार,क्षेत्रपाल, घण्टाकर्ण मूर्तीची स्थापना आदी कार्यक्रम आचार्य कल्पवृक्षनंदीजी महाराज यांच्या हस्ते राबविण्यात आले.
या विश्वशांती महायज्ञ सोहळ्यात औरंगाबाद, जळगाव, धूळे बुलढाणा,जालना नागपूर,मुंबई,पुणेसह राजस्थान,गुजरात, मध्यप्रदेश,बिहार,राजस्थान आदी राज्यातील जैन समाज बांधवांनी उपस्थिती नोंदविली होती.या विश्वशांती महायज्ञाचा समारोप दि.११ सोमवारी विधान पूजेने करण्यात आला.

हा विधान पूजा व विश्वशांति महायज्ञ कार्यक्रम प.पु.बाहुबली सागरजी महाराज, तीर्थनीदेशिका सपनादीदी, विमलादीदी,कुसुमदीदी यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित वर्धमान शास्त्री अंधेरी मुंबई, धर्मप्रेमी महानुभव जया अनिल बंडी विलेपार्ले मुंबई व विनोदनी पाटनी यांनी जबादारी पार पाडली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी सोनाली एंड पार्टी सांगली अनिल बंडी, अशोक हुमड़,संच्चालाल जैन
हा विश्वशांती सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी तिर्थ संचालिका सपना दीदी,अध्यक्ष अनिल बंडी, उपाध्यक्ष मनोज छाबडा,सचिव सुनिल जैन,सतीश साखरे,अनिल लुहडीया,विनोदीनी पाटणी,जया बंडी आदीनी विशेष परीश्रम घेतले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.