सोयगाव,ता.१२:आठवडा विशेष टीम―
अवकाळीच्या तडाख्यानंतर दिलेल्या विश्रांतीच्या आठवडाभराच्या कालखंडातही शेतातील पाणी कमी होण्यास तयार होत नसल्याने उभ्या पिकांमध्ये शेती पिचडल्याने शेताचा पोत कमी होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहे.
सोयगाव तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपा दिल्यानंतर आठवड्याचा कालावधी लोटला तरीही शेतातील साचलेले पाणी कमी होण्यास तयार नसल्याने शेतीला पाण्याचा पाझर फुटल्याचे चित्र सोयगाव तालुक्यात निर्माण झाले आहे.दरम्यान उभ्या पिकांमध्ये आठवड्यापासून पाणी असल्याने मका कुजलेल्या स्थितीत पडून आहे तर कापूस वेचणी करण्यास या साचलेल्या पाण्यामुळे अडचणी निर्माण होत आहे.उभ्या पाण्यात असलेल्या पिकांना कुजक्याचे प्रमाण वाढले असून शेतातील पाण्याने पाण्यामुळे काही भागात रब्बीची पेरण्या रखडल्या आहे.सध्या सोयगाव तालुक्यात रब्बीसाठी पोषक वातावरण तयार झालेले असतांना,मात्र शेती पाण्याने व्यापल्याने रब्बीच्या पेरण्यांना चिखलाच्या अडचणी निर्माण झाल्या आहे.
सोयगाव मंडळात रब्बीच्या पेरण्या निरंक-
सोयगाव मंडळातील गावांमध्ये रबीच्या पेरण्यांच्या क्षेत्रात घट झाली असून अवकाळी पावसाच्या व्यत्ययामुळे या मंडळात रब्बीच्या पेरण्यांना अडचणी निर्माण झाली आहे.त्यामुळे सोयगाव मंडळातील शेतकऱ्यांना एक हंगाम पिकावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.