अंबाजोगाई (प्रतिनिधी): येथील शिक्षीका श्रीमती वैशाली सारणीकर (भगत) यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शनिवार,दि.23 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे झालेल्या विशेष समारंभात शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी ऑनलाईन पध्दतीने राज्य पुरस्काराची निवड करण्यात आली.दि.3 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2019 राज्यभर सोशल मिडीयाच्या माध्यमातून लिंक भरण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन पध्दतीने अतिशय पारदर्शक निवड करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यभरातून 4 हजार अर्ज निवड समितीला प्राप्त झाले होते.यातून छाननी करुन ही निवड करण्यात आली आहे. सदरील पुरस्कार सोहळा हा शनिवार,दि.23 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता सरस्वती भुवन औरंगपूरा,औरंगाबाद येथे संपन्न झाला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा.इंद्रजीत भगत यांच्या श्रीमती वैशाली सारणीकर या पत्नी आहेत.सध्या त्या लातूर जिल्ह्यातील रेणापुर तालुक्यात जिल्हा परिषद प्रशाला,पानगाव येथे माध्यमिक शिक्षिका
म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांना सन 2003 पासुन इंग्रजी विषय शिकवितात.शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल श्रीमती वैशाली सारणीकर यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सचिन गायकवाड,अशोक धिरे, पञकार संतोष बोबडे, राजाभाऊ पोटभरे, अरुण पोटभरे,स्वप्निल गायकवाड,डॉ.मुकूंद राजपंखे,प्रा.नामदेव देवकते,पञकार रणजित डांगे यांचे सहीत अधिकारी, शिक्षक मित्र परिवार, नातेवाईक यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.