पाटोदा तालुकाबीड जिल्हाविशेष बातमी

बीड: पाटोदा नगरपंचायतचा कारभार म्हणजे मला पहा आणि फुले वाहा

सत्ताधाऱ्यांना सामान्य जनतेचे प्रश्न सोडवता येत नसतील तर सरळ राजीनामे द्यावेत जनतेला विठीस का धरतात - उमर चाऊस

पाटोदा:गणेश शेवाळे―ग्रामपंचायत बरखास्त होऊन पाटोदा शहराला नगरपंचायत होईन चार वर्षे पुर्ण झाली माञ पाटोदा शहरातील नागरिकांना आतापर्यंत मूलभूत सुविधा मिळेनात दहा ते पंधरा दिवस झाली शहरातील नळाला पाणी येईना काही भागात दिवसा विद्युत दिवे चालू तर काही भागात रात्री लाईटच नसते शहरात मच्छरांचा सुळसुळाट झाला असून नगरपंचायत कडे फॉगिंग मशीन नसल्यामुळे धूर फवारणी करता येईना यामुळे पाटोदा शहरात साथीच्या रोगाचे प्रमाण वाढले आहे परतीचा पाऊस झाल्याने नदीला पाणी आले यामुळे पाण्याची पातळी वाढली मात्र नगरपंचायतकडे हातपंप दुरुस्त करणारी यंत्रणा नसल्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागते महिना-महिना कर्मचारी व अधिकारी नगरपंचायत कार्यालयात येत नाहीत यामुळे जनतेला कामासाठी रोज नगरपंचायत मध्ये खेटे मारावे लागतात यावर कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यावर धाक नाही यामुळे नगरपंचायत चा कारभार म्हणजे मला पाहा आणि फुलं वाहा असाच असुन जर सत्ताधाऱ्यांना जनतेची कामे करता येत नसतील तर सरळ राजीनामे द्यावेत सामान्य जनतेला विठीस का धरतात असा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसचे युवानेते उमर चाऊस यांनी केला आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.