लेख

गर्व से कहो हम हिंदू है सांगत सर्वधर्मीयांचा आदर करणारे हिंदु हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे

गर्व से कहो हम हिंदू है सांगत सर्व धर्मीयांचा आदर करणारे हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी.
त्यानिमित्ताने वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरें साठी लिहिताहेत राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा शैक्षणिक सामाजिक राजकीय चळवळींवर भाष्य करणारे चिकित्सक विचारवंत तथा लेखक शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर .
हा लिखाणाचा प्रपंच म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली आहे. मुक्तसंवाद आहे कृपया याचा राजकीय वा इतरअन्वयार्थ कोणीही कुठेही काढू नये.

अनेक नेते येतात आणि जातात निवडणूक, पद ,प्रचार ,पैसा, सत्ता एवढ्यापुरतेच ते राहतात .परंतु कायम स्मरणात राहणारे युगानुयुगे नाव म्हणजेच हिंदु हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीयसाहेब बाळासाहेब ठाकरे होय.सर्वप्रथम एक कलाकार म्हणून एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली इसवी सन 1950 मध्ये ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत होते.स्वर्गीय बाळासाहेबांनी राजकारणात सत्ताकारणात जात या घटकाचा अजिबात विचार केला नाही तसेच त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले त्यामुळेच अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापदे पर्यंत पोहोचण्यात त्यांनी यशस्विता साधली हाच इतर पक्षांमध्ये व शिवसेनेत आणि इतर नेत्यांत मध्ये आणि स्वर्गीय बाळासाहेबांमध्ये असलेला मोठा फरक होता. शिवसेनेमध्ये अनेक सामान्यातून सामान्य लोक मोठी झालीत नेते झालीत आमदार झालीत मंत्री झाली. रोडवरचा टपरीवरचा माणूस आमदार होतो मंत्री होतो जातीपातीची कोणतीच बंधने त्याला आडवे येत नाहीत हे शिवसेनेने व शिवसेनाप्रमुखांनी दाखवून दिले. तरुणांची मने जिंकून घेणे, सहकारी संस्था साखर कारखाने अशा पारंपारिक राजकारणात न गुंतणे,महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानी एकच विचार घेऊन व हिंदुत्वाची धारा अंगी बाळगून स्वर्गीय बाळासाहेबांनी संपूर्ण देशाला आणि राजकारणाला एक नवा आदर्श विचार दिला. 19 जून 1966 रोजी शिवसेना भवन दादर मुंबई असलेल्या शिवसेना पक्षाची स्थापना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली.शिवसेना हा भारतातील एक महत्त्वाचा प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. प्रत्येक मराठी माणसाने मराठीचा स्वाभिमान महाराष्ट्राचा स्वाभिमान अंगी बाळगायला हवा यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. एके दिवशी खूप लोक जमली होती प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेबांच्या वडीलांनी बाळासाहेबांना प्रश्न केला बाळ लोक तर जमली आता याला याला संघटनेचे रूप द्यायला हवे संघटनेला नाव काय देणार? बाळासाहेब म्हणाले होते विचार तर चालू आहे तेवढ्यात प्रबोधनकार ठाकरे म्हणाले मी सांगतो ते नाव दे ...शिवसेना. आणि मग शिवसेनेची स्थापना झाली व शिवसेना जन्माला आली. शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर 30 ,1966 रोजी शिवतीर्थावर झाला. प्रचंड गर्दीचा शिवसेनेच्या मेळाव्याचे परंपरा आजही कायम आहे.समाजसुधारकांची समृद्ध परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात मराठी माणूस काय मागे आहे हा विचार घेऊन पुढे येणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे खरे लोक नेते ठरले. लोकांच्या मनावर राज्य गाजविले स्थान निर्माण केलं व शिवसेनेला सत्तेच्या प्रवाहात आणणारे बाळासाहेब ठाकरे आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. झुणका-भाकर केंद्र योजना वृद्धाश्रम साखळीयोजना, वृद्धांना सवलती झोपडपट्टीवासीयांना साठी घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बे चे मुंबई नामकरण या सर्व गोष्टी मागे बाळासाहेबांचा विचार व संकल्पना होती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दूरदृष्टी जपत.महाराष्ट्र मुंबईसाठी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी व महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या शाश्वत विकासासाठी त्यांच्या मनात खूप मोठी स्वप्ने होती.
हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट बोलले. तसेच या राज्यात राहून राज्याच्या हिताचा विचार करणाऱ्या सर्व धर्म भाव मांडणाऱ्या सर्व धर्मीयांच्या बाळासाहेबांनी तितकाच आदर करून स्वीकार देखील केला."गर्व से कहो हम हिंदू है "या घोषणेला खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात अर्थ प्राप्त झाला तो स्वर्गीय बाळासाहेबांमुळेच. म्हणूनच त्यांना हिंदुहृदय सम्राट व सरसेनापती शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असे आजही सर्वांच्या तोंडून संबोधले जाते. त्यांच्या जीवनावर ठाकरे नावाचा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत निघाला आहे चित्रपटाची निर्मिती ज्येष्ठ पत्रकार व सध्याच्या चालू राजकीय घडामोडी मध्ये शिवसेना पक्षासाठी सत्तास्थापनेसाठी मुख्यमंत्री शिवसेनेचाच करण्यासाठी स्वतःचा प्रगल्भ व स्वाभिमान अभ्यासू बाणा दाखवून वाटचाल करणारे संपादक संजय राऊत यांची आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी हे बाळासाहेबांच्या भूमिकेत आहेत 25 जानेवारी 2019 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेबद्दल एक शिक्षक म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला लिहिण्यासारखे भरपूर काही आहे.बाळासाहेबांनी शेवटच्या टप्प्यातील सभेतील सांगितलेली एक बाब अजूनही आठवते," उद्धव ला सांभाळा". आज बाळासाहेब ठाकरे खूप खुश असतील कि आदरणीय शिवसेनाप्रमुखउद्धव साहेबांनी त्यांचा पक्ष चांगल्या पद्धतीने सांभाळला.युवा नेतृत्व म्हणून आधी ते साहेबांनी देखील स्वतःचं चांगला अस्तित्व निर्माण केले आहे.सर्व शिवसैनिकांनी देखील महाराष्ट्राच्या बाणा बुलंद केला आहे. लोकशाहीमध्ये वेगवेगळे पक्ष असतात विचारधारा वेगळ्या असतात परिस्थितीनुसार काही निर्णय प्रत्येक पक्षांना व नेत्यांना घ्यावी लागतात. हे सर्व करत असताना वैयक्तिक पातळीवर वैयक्तिक शत्रुत्व व द्वेष कोणी कोणाचा करू नये हे देखील महत्त्वाचे असते. असे देखील मला याप्रसंगी वाटते. मुंबई आणि बाळासाहेब या दोन गोष्टींचा मला लहानपणापासून विशेष आकर्षण होते. मुंबईसाठी बाळासाहेबांचे योगदान अतुलनीय आहे.माझ्या संपूर्ण आयुष्यातसर्व क्षेत्रातील थोर समाजसुधारक थोर नेत्यांना भेटणे व त्यांच्यापासून शिकणेही माझी मूलभूत आवड आहे मला एकदा बाळासाहेबांना भेटता आले म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या सहकार शिक्षण पत्रकारिता सर्व क्षेत्रातील मना मनावर राज्य करणारे लोकनेते होते. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रत्येक पक्षात जीवाला जीव लावणारे मित्र देखील होते. मातोश्री मीनाताई ठाकरे यांनी त्यांना खंबीर साथ दिली. प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने सांगू शकेल, मिरवू शकेल आणि जगू शकेल असा मराठी बाण्याचा माणूस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला आणि समाजकारणाला अग्रक्रम देणाऱ्या राजकारणाची संपूर्ण देशात व महाराष्ट्रात सिद्धता सिद्ध केली.अमोघ वक्तृत्व आणि मुद्द्याला थेट भिडणारा रोखठोक स्वभाव यामुळेच बाळासाहेबांना अनुयायांचा निरपेक्ष आणि चिरंतर व भरभरून प्रेम लाभले. जे बोलायचं ते रोख ठोक माघार नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना दिवंगत प्रमोदजी महाजन गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यासोबत राजकीय पेचप्रसंग प्रसंगी मनमोकळ्या पद्धतीने आधान प्रदान करणे आवडे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी साडेतीन वाजता मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी निधन झाले.त्यांच्या आईचे नाव रमाबाई तर वडिलांचे नाव प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे होते.त्यांना तीन मुले एक म्हणजे शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे , बिंदुमाधव ठाकरे व जयदेव ठाकरे. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1926 पुणे येथे झाला होता. स्वर्गीय बाळासाहेबांना मीनाताईंच्या रूपाने खंबीर व प्रत्येक प्रसंगात साथ देणारा आधारवड जीवन जोडीदार मिळाला होता.17 नोव्हेंबर 2012 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबई मृत्यू झाला ,तद्नंतरमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वाडी-वस्ती वरून सर्वसामान्य जनता मुंबईच्या दिशेने निघाली त्यावेळी जमलेला ऐतिहासिक असा मोठा मुंबईतील विराट उसळलेला जनसमुदाय शिवसेनाप्रमुखांची श्रीमंती सांगून जातो. बाळ केशव ठाकरे उर्फ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे जगाच्या पाठीवरील एकमेव असे व्यंगचित्रकार ठरलेले आहेत की त्यांनी आपल्या कुंचल्याच्या सहाय्याने सत्तेच साम्राज्य उभ केलं.जनतेच्या मनातील विचार नेमकेपणाने ओळखून त्यांची नाडी ओळखून ते विचार एकमेवादित्य अशा वकृत्व शैली च्या साह्याने म्हणणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे हा त्यांचा स्थायीभाव. जसे महाराष्ट्रातील नेतृत्व शरद पवार साहेबांनी अनेक नेते व माणसं उभी केली त्याच पद्धतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आपल्या जीवन कार्यात अनेक सर्वसामान्य सर्वस्तरीय माणसांना ओळखले व उभ केल यामध्ये प्रामुख्याने आदरणीय सर्व श्री माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, सुधीर जोशी ,प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ ,सुरेश प्रभु ,आनंद दिघे ,दत्ताजी नलावडे, गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, चंद्रकांत दादा पाटील, असे शेकडो नावं घेता येतील.
अशा या श्रीमंत महामानवास युगपुरुष नायकास खऱ्या अर्थाने निस्वार्थ जीवन जगणाऱ्या लोकनेत्यास पुण्यतिथी निमित्ताने किशोर पाटील कुंझर कर परिवार, शिक्षण संघटना राज्य समन्वय समिती तसेच तमाम महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या वतीने वतीने विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो . जय महाराष्ट्र.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  लेखक
  किशोर पाटील कुंझरकर

  राज्य समन्वयक राज्य समन्वय समिती शिक्षक संघटना
  एरंडोल तालुका एरंडोल जिल्हा जळगाव.
  70 30 88 71 9 0

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.