सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यातील दहा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सोयगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी थेट शाळेत पोहचून विद्यार्थ्यांना बालहक्क संरक्षण कायद्याच्या बाबतीत जनजागृती करून या शिबिरांमधून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले सोमवारी सोयगाव पोलीस ठाण्याच्या वतीने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
सोयगांवसह,जरंडी,रामपूरवाडी,कवली,तिडका,घोसला,बनोटी आणि गोंदेगाव या गावांमध्ये थेट शाळांमध्ये पोलीस पोहचून याबाबत मार्गदर्शन शिबिरे घेवून जनजागृती करण्यात आली.पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी दहा गावातील सुमारे १०५५ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सोयगाव शहरातील जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात,अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक आनंदा इंगळे होते.पोलीस निरीक्षक श्री सिताराम मेहेत्रे,विकास लोखंडे व विनोद कोळी होते.पोलीस निरीक्षक श्री सिताराम मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना बालहक्क कायदा बाबतीत सखोल मार्गदर्शन केले.त्यामध्ये महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची जुलै २००७ मध्ये स्वायत्त मंडळ म्हणून बाल हक्क संरक्षण कायदा २००५ लागु झाला याबाबत सखोल मार्गदर्शन केले.आभारप्रदर्शन व मनोगत पर्यवेक्षक गिरीष जगताप यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दौलतसिंग परदेशी यांनी केले .