सोयगाव,ता.१८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
पाचोरा ते जामनेर रस्त्यावर मालखेडा ता.पाचोरा गावाजवळ जवळ दोघा मोटरबाईक चा अपघात होऊन जामनेरचा तरुण एक जागीच ठार तर चार गंभीर जखमी उपचार घेत आहेत.त्यापैकी दोघे सोयगाव शहरातील आहे.या अपघाताची माहिती सोमवारी शहरात धडकताच हळहळ व्यक्त झाली होती.
पाचोरा ते जामनेर रस्त्यावर मालखेडा जवळ दोघा मोटरबाईकचा समोरासमोर अपघात झाला.या भीषण अपघातात जामनेर येथील राकेश लोणारी हा जागीच ठार झाला आहे.तर दुसर्या मोटारसायकल वरील सोयगांव येथील विलास राऊत आणि हरीष सोहनी या दोघांना गम्भीरावस्थेत पाचोरा शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेची माहिती मिळताच जखमींना मदत करण्यासाठी अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पाचोरा शहराकडे हलविण्यात मदतकार्य केले.