पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारण

पाटोदा: झोपेचे सोंग घेतलेल्या नगरपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने बेशरमचे झाडे लावुन भ्रष्टकारभाराचा केला निषेध

पाटोदा:गणेश शेवाळे―पाटोदा शहरातील प्रमुख मार्ग ज्या मार्गावर तहसिल कार्यलय, रेणुका माता मंदिर,न्यायालय, पीव्हीपी कॉलेज,जि.प.कन्या शाळा,तसेच सर्व महत्त्वाचे कार्यलय आहेत तो म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते ढाळेवाडी रस्त्यावर नुसते खड्डेच खड्डे असुन या रस्त्यावर पाटोदा शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन असुन ती फुटल्याने रस्त्यावर छोटे छोटाले तळे साचले आहेत यामुळे शहरातील नागरिक तसेच शाळेत जानार्या मुलांना यांचा नाहक ञास सहन करावा लागतो ही परिस्थिती अनेक दिवसा पासुन आहे वारंवार सांगून देखील ही परिस्थिती सुधारणा म्हणून झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनला जागे करण्यासाठी राष्ट्रीय कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने बेशरमाचे झाडे लावून आंदोलन करण्यात आले.

यावेळी कॉग्रेसचे युवानेते उमर चाऊस,तालुकाध्यक्ष गणेश कवडे, अँड.सय्यद वहाब,नगरसेवक सुभाष अडागळे,आबलुक घुगे,चक्रपाणी जाधव,बापुराव जाधव,चांगदेव गिते,डॉ,सय्यद रिजवान,शेख नासेर,सय्यद सज्जाद,राहुल बामदळे,राज घुमरे, प्रकाश सवासे,जावेद शेख,दिपक आडागळे,राहुल सोनवने,यांच्या सह इत्यादी कार्यक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.