औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव:जरंडी,निंबायती बीएसएनएल मनोरे दुसऱ्या दिवशीही बंदच,ग्राहकांचे सिमकार्ड संकलन अभियान

सोयगाव,ता.१९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जरंडी आणि निंबायती येथील बीएसएनएलचे मनोरे सलग दहाव्या दिवशीही बंदच असल्याने मंगळवारी परिसरातील दहा गावांची सेवा ठप्प झाली होती,त्यामुळे वैतागलेल्या दहा गावातील ग्राहकांनी मात्र बीएसएनएलचे सिमकार्ड गोळा करून सोयगावच्या दूरध्वनी केंद्रात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोयगाव वरुण मुख्य दूरध्वनी केंद्रातील बीएसएनएलच्या मनोर्यावरून जरंडी आणि निंबायती येथील मनोऱ्यांना कव्हरेज पुरविण्यात येते,परंतु सलग दहा दिवसापासून या दोन्ही गावातील मनोरे बंद अवस्थेत असल्याने या भागातील दहा गावांची सेवा विस्कळीत झालेली आहे.दरम्यान वैतागालेलाय या दहा गावातील ग्राहकांनी मात्र सिमकार्ड गोळा करून सोयगावच्या बीएसएनएल कार्यालयात जमा करून दुसऱ्या खासगी कंपनीची सेवा मिळविण्याचा निर्णय घेतला असून त्यातच निंबायती आणि जरंडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मनोरे संबंधित विभागाने उचलून घेण्याचा ठरावही घेतला आहे.त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी या त्रासापासून कायमची मुक्ती मिळविण्याचा निर्णय घेतला आहे.

जरंडीच्या मनोऱ्यावर या विभागाचा सुरक्षा रक्षकच नसल्याने तक्रार कोणाकडे करावी हा प्रश्न उपस्थित झाला आहे.त्यामुळे असुरक्षित असलेला हा गावातील मनोरा उचलून घ्या अशी मागणीच ग्रामस्थांनीच या विभागाकडे केली आहे.

औरंगाबादवरुण पाहिलंय जातो कारभार-

सोयगाव दूरध्वनी विभागाचा कारभार औरंगाबादवरुण पहिल्या जात आहे.त्यामुळे तक्रारी स्वीकारण्यासाठी सोयगावचं दूरध्वनी केंद्रात केवळ बोटावर उरेल इतकेच कर्मचारी उपस्थित राहतात,कार्यालयीन प्रमुख मात्र औरंगाबादवरुण कारभार पाहत असल्याचे मंगळ�

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.