आर्थिकबीड जिल्हामहाराष्ट्र राज्यराजकारण

रस्तेमहर्षी आ.भीमराव धोंडे यांचे प्रयत्नाने आष्टी मतदारसंघातील ४ रस्त्याला १० कोटी रुपये मंजुर

आठवडा विशेष |प्रतिनिधी

आष्टी(बीड): लोकप्रिय रस्तेमहर्षी आ.भीमराव धोंडे यांनी आष्टी मतदारसंघातील चार प्रमुख रस्त्याला 10 कोटी रु निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचेकडुन मंजुर करुन घेतला आहे .रस्तेमहर्षी आ भीमराव धोंडे यांनी आष्टी मतदारसंघात ना.पंकजाताई मुंडे खा.प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून व केंद्र व राज्य शासनाच्या बांधकाम विभागातुन व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागतात असतानाच गेल्या 20 वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या धामणगाव व दौलावडगाव गटातील प्रमुख असलेल्या व गहिनीनाथ गडला जाणारा रस्ता मा.आ.भीमराव धोंडे यांनी मंजुर करुन घेतले आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांना जा.क्र.360/2018 दि.3/10/2018 रोजी पत्र देऊन मतदारसंघातील रस्त्याला मंजुरी देण्याबाबत मागणी केली होती त्या अनुषंगाने आष्टी आणि पाटोदा तालुक्यातील चार रस्त्याला 10 कोटीचा निधी आर.एम.आर.2018/प्र.क्र.167/रस्ते-1 सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई दि.24/1/2019 रोजीच्या शासन आदेशान्वये सन 2018-2019 योजनेतर देखभाल दुरुस्ती अंतर्गत 1) जिल्हा सरहद माळेवाडी -पाटसरा-हातोला-ते रामा-16 ते चिचोली-चिखली-मुगगाव-सौताडा-रस्ता रामा-55 प्रजिमा-5कि.मी.7/0 ते 12/0 ची दुरुस्ती ता.आष्टी ( खडकवाडी ते हातोलाफाटा) 3 कोटी

2)इजिमा-2 ते मुळेवाडी-बांधखेल-चिचेवाडी-अरणविहीरा- तागडखेल-ते प्रजिमा-1रस्ता प्रजिमा-67 कि.मी.0/0ते 11/00 ता.आष्टी 4 कोटी रु रा.म.मार्ग 211 बीड-पालवण-नागझरी-बेनसुरा-भायाळा-वैद्यकिन्ही-पाचेगाव-पाचंग्री रस्ता प्रजिमा 31 कि.मी 23/00 ते 26/00 ता.पाटोदा 1 कोटी हातोला-पाटसर फाटा ते गहिनीनाथ गड चिचोली मुगगाव सौताडा रस्ता प्रजिमा -5 कि.मी.12/00 ते 16/00 दुरुस्ती करणे ता.पाटोदा 2 कोटी रु या रस्त्याला मंजुरी मिळाल्याने या भागातील नागरिकांचे दळणवळणस चालणा मिळणार असुन विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे विशेष म्हणजे गहिनीनाथ गड येथे दि.28 जानेवारी रोजी पुण्यतिथी सोहळा असतो याच दरम्यान हातोला ते गहिनीनाथगड रस्ता मंजुर झाला हे महत्वाचे होत आहे. लवकर दौलावडगाव गटातील काही रस्ते मंजुर होणार असल्याचे आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले आहे


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.