पाटोदा तालुकाबीड जिल्हाविशेष बातमी

पाटोदा: शेतात काम करत असताना विज पडुन दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीला शासनाकडुन मदत

पाटोदा:गणेश शेवाळे―पाटोदा तालुक्यातील अमंळनेर येथील शेतकरी कै.शिवाजी पांडुरंग पोकळे यांचा एक महिन्यापुर्वी शेतात काम करत असताना अचानक विज पडुन दुर्दैवी मृत्यु झाला होता यामुळे पाटोदा तहसिलने या दुर्दैवी घटनेच्या तपशील वरिष्ठना कळून शेतकरी शिवाजी पोकळे यांच्या पत्नी श्रीमती वैजंताबाई शिवाजी पोकळे यांना मदत म्हणून चार लक्ष रुपये मिळवुन दिले हा चार लक्ष रुपायचा धनादेश मृत्यू शेतकऱ्यांच्या पत्नीला देताना पाटोदा तहसिलचे नायब तहसिलदार टाकसाहेब,आष्टी मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उपस्थित अमंळनेरचे सरपंच उध्दवशेठ पवार, दादासाहेब पवार, मच्छिंद्र आबा धनवडे, काकासाहेब शिंदे, पञकार चंद्रकांत पवार व इत्यादी.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.