औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

औरंगाबाद: जामनेर तालुक्यातील तरुणाचा सोयगावजवळ मृतदेह आढळला,नातेवाईकांचा घातपाताचा संशय

सोयगाव,(जि.औरंगाबाद):ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जामनेर तालुक्यातील लिहेतांडा(ता.जामनेर)येथील तरुणाचा गुरुवारी पहाटे शहराजवळ मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.मृत तरुणाच्या शरीराला किरकोळ जखमा आढळून आल्या असून नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला असून सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किसन रुपचंद चव्हाण(वय ३५)रा.लिहेतांडा ता.जामनेर असे मृत तरुणाचे नाव आहे.सोयगाव शहराच्या हाकेच्या अंतरावर या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता,याप्रकरणी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणल्यावर त्यास वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले.या तरुणाची आत्महत्या कि घातपात याबाबत अद्याप कोणताही उलगडा झालेला नसून शहरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.सोयगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.सोयगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकर कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.घोरपडे यांनी शवविच्छेदन केले,अंत्यसंस्कारासाठी शव नातेवाईकंच्या ताब्यात देण्यात आले आहे.सोयगावचे पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संयोष पाईकराव,स्वप्नील दिलवाले,विकास तायडे,दिलीप तडवी,आदी पुढील तपास करत आहे.
या मृत प्रकरणात मयताच्या नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केलेला असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून संशयाच्या दिशेने तपासाची सूत्रे हलविली आहे.या प्रकरणाचा लवकरच छडा लागेल असा विश्वास पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी व्यक्त केला आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.