औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणसोयगाव तालुका

सोयगाव:तीन ग्रामपंचायतीच्या तीन जागा बिनविरोध

सोयगाव,ता.२२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
दहा ग्रामपंचायतींच्या अकरा जागांसाठी होवू घातलेल्या पोटनिवडणुकांमध्ये शुक्रवारी छाननीतच तीन जागा बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी देविदास साळुंखे यांनी पीठासन अधिकारी प्रवीण पांडे यांच्या आदेशावरून घोषित केल्या आहे,दरम्यान माघारी आधीच सोयगाव तालुक्यात ग्रामपंचायतींच्या तीन प्रभागात बिनविरोध निवडणुका झाल्या असून ग्रामाद्थांनी अनावश्यक खर्च टाळण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सोयगाव तालुक्यात दहा ग्रामपंचायातींसाठी अकरा जागांच्या पोटनिवडणुका होवू घातल्या असतांना नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या अंतिम दिवशी किन्ही,घोसला,निंबायती या तीन ग्रामपंचायतीसाठी चार अर्ज दाखल झाले होते,शुक्रवारी छाननीच्या दिवशी घोसला ग्रामपंचायतीसाठी प्रकाश गव्हांडे यांनी माघारीच्या आधीच छाननीत माघार घेतल्याने तीन ग्रामपंचायातींसाठी तीन प्रभागासाठी तीनच अर्ज उरल्याने निवडणूक निर्णय अधिकारी देविदास साळुंखे यांनी किन्ही-प्रभाग क्र-एक मधून सर्वसाधारण साठी सुभाष वाडेकर,निंबायती-प्रभाग चारसाठी शांताराम फरकांडे,आणि घोसला-प्रभाग एक साठी रवींद्र विष्णू पाटील यांचे अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.दरम्यान छाननीचा अहवाल जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना पाठविण्यात आला आहे.यासाठी पीठासन अधिकारी तहसीलदार प्रवीण पांडे,निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विठ्ठल जाधव,मकसूद शेख,सतीश देशमुख,साहेबराव शेळके,देविदास साळुंखे यांनी प्रक्रियेदरम्यान कामकाज पहिले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.