परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

बीड: परळी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातअवैध धंद्यांना खाकीची साथ

परळी:आठवडा विशेष टीम―परळी शहरात व तालुक्यात खाकीच्या आशीर्वादाने अवैद्य धंदे बोकाळले असून शहरचे दोन व ग्रामीण पोलीस असे तिन्ही स्टेशनचे पोलीस हप्ता गोळा करून बघ्याची भूमिका घेत असुन कोतवालाचा हात या अवैद्य धंदेवाल्यावरअसल्याने राजरोषपणे शहरात व तालुक्यात मटका नावाचा जुगार पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने खुलेआम चालू आहे.तसेच गुटखा खुलेआम विकला जात असुन अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांची देखील या मध्ये कमी नाही जो वाहन चालक मालक पोलिसांना हप्ता देणार नाही अशाच लोकांच्या वाहनावर खटले दाखल करण्यात येतात. जो वाहन चालक वाहतूकीचे नियम पाळून वाहन चालवून स्वत च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो. व मुलाबाळांचे चांगल्याप्रकारे संगोपन केले जाते. अशी वाहन चालक पोलीस प्रशासनाला हप्ते देवून फारच वैतागून गेले आहेत. पोलिस ठाण्यात आलेल्या प्रकरणात हजारो रुपये घेऊन तडजोड करतात.
शहरातील व तालुक्यातील मटका माफिया,गुटखा व वाळू माफिया, धाब्यावाले, वाहतूक करणारे चार चाकी तिन चाकी गाडी तसेचअवैध रित्या दारू विक्री करणाऱ्या कडुन दलालांच्या माध्यमातून परळीचे तीनही पोलीस स्टेशन महिन्याकाठी लाखोंचा हप्ता जमा करतात अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
परळी शहर, संभाजीनगर व ग्रामीण पोलीस ठाण्याला महिन्याकाठी लाखो रूपयांचा अवैध रित्या मावेजा मिळतो. या खाकी वर्दीतील काळे धंदे करणार्‍या कर्मचार्‍यांना व अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार साहेब आळा घालतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या मुळे पोलीस प्रशासनाच्या विरोधात परळी तालुका व शहरात नाराजीचा सूर दबक्या आवाजात ऐकावयास मिळत आहे.

परळी शहर व तालुक्यातील अवैद्य

धंद्याची संपुर्ण माहिती मुख्यमंत्री समोर ठेवणार―वसंत मुंडे

महा विकास आघाडी चे सरकार स्थापन झाल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याबरोबर परळी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत सर्व ग्रामीण भाग व शहरांमध्ये अवैद्य धंद्याला पोलीसां मार्फत प्रोस्ताहन मिळत असुन त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर विद्यार्थ्याच्या जन जीवनावर पडत असून यासंदर्भात आवाज उठून मुख्यमंत्र्याला हे अवैद्य धंदे बंद करण्यास शासनाकडून आदेश काढण्यासाठी प्रयत्न करू व अवैध धंद्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार तसेच या अवैद्य धंद्यानां जे अनेक वर्षापासुन परळीत ठाण मांडुन बसलेले हप्ते बहाद्दर ,बीट अमलदार व तीनही पोलीस स्टेशनचे पो.नी.यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात यावी याचा आग्रह केला जाणार असे वसंतराव मुंडे चेअरमन श्रम रोजगार विभाग नाशिक भारत सरकार यांनी सांगीतले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.