सोयगाव दि.१८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव पंचायत समितीच्या बचत भुवन सभागृहाला अचानक तडे गेल्याने सभागृहातील बैठकीला आलेल्या कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात गेला होता.दरम्यान बचत भुवन सभागृहात विविध शासकीय योजना व अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी बैठका घेण्यात येतात,परंतु या सभागृहाची इमारतच धोकादायक झाली असून या धोकादायक इमारतीत विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना बैठकीला बसावे लागत आहे.
शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांच्या या सभागृहात बैठका घेण्यात येतात,परंतु गेले अनेक दिवसापासून या सभागृहाची इमारत जीर्ण झालेली असून या इमारतीच्या छताला तडे जावून भिंतींनाही मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहे.बुधवारी सभागृहात पीकविमा योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी बैठक सुरु असतांना हा प्रकार उघड आला आहे.दरम्यान बैठकींना कर्मचाऱ्यांना जीव भांड्यात घेत छताखाली बासावे लागत आहे.संबंधित इमारतीची अनेक वर्षापासून डागडूजीही झालेली नाही.संबंधित बांधकाम विभागाचे या इमारतीकडे दुर्लक्ष झालेले आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेने या सभागृहाच्या नाजुलाच नवीन सभागृह उभारण्याचे काम हाती घेतले असून तीन वर्षापासून या सभागृहाच्या कामाची अपूर्णता असल्याने निधी असूनही या सभागृहाचे काम अडगळीत पडले आहे.जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांनी या अपूर्ण अवस्थेतील बांधकामाबाबत अनेकवेळा पाठपुरावा करून जिल्हा परिषदेत तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप पुष्पा काळे यांनी केला आहे.