प्रियदर्शनी क्रीडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या विद्यार्थी साहीत्य संमेलनातून विद्यार्थ्यांवर संस्कार―दिनकर जोशी

साहित्य संमेलनातून मिळते विचारांना चालना-उद्घाटक सौ.सुनंदा धर्मपाञे

विद्यार्थी साहीत्य संमेलनात दीड हजार विद्यार्थी सहभागी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
प्रियदर्शनी क्रीडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने मंगळवार,दिनांक 19 नोव्हेंबर 2019 रोजी अंबाजोगाई शहरातील शालेय विद्यार्थ्यांचे साहीत्य संगेलनाचे आयोजन करण्यात आले होते.शालेय विद्यार्थ्यांच्या साहित्य अभिरुचीला चालना मिळावी, यासाठी प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या स्वरचित किंवा त्यांना आवडलेल्या कविता व
कथाकथनाचे बहारदार सादरीकरण याप्रसंगी विद्यार्थ्यांना करता यावे या विधायक भूमिकेतून विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.या संमेलनास विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संमेलनाची सुरूवात
सकाळी ठिक 9 वाजता ग्रंथदिंडी काढून झाली.या ग्रंथदिंडीचा प्रारंभ शिवाजी चौकातून झाला.यामध्ये विविध शाळांमधील जवळपास 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.विविध विद्यार्थी शेतकरी, महाराष्ट्रातील थोर संत,नेते, क्रांतीकारक यांच्या वेषभूषेत होते.विद्येची देवता सरस्वतीच्या वेषभूषेतही विद्यार्थी दिसून आले.विविध ठिकाणी लोक दिंडीतील पालखीचे स्वागत करीत होते.हि दिंडी शिवाजी चौक-मंडीबाजार-पाटील चौक- बसस्टँड मार्गे पुन्हा कार्यक्रम स्थळी म्हणजे लोकनेते विलासरावजी देशमुख सभागृह येथे पोहोचली.ही दिंडी पाहण्यासाठी लोकांच्या रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.ग्रंथदिडी नंतर साहित्य संमेलनाचे रितसर उद्घाटन खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सुनंदा धर्मपाञे यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे
सांस्कृतिक विभागप्रमुख साहित्यिक दिनकर जोशी हे होते.या प्रसंगी व्यासपीठावर साहीत्य संमेलनाचे समन्वयक राजेश कांबळे,घाटनागनाथ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली जोशी
हे मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थी साहीत्य संमेलनाच्या
उद्घाटक म्हणून बोलताना मुख्याध्यापिका सौ.सुनंदा धर्मपाञे म्हणाल्या की, प्रियदर्शनी क्रीडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.या कार्यक्रमाचे विचारपूर्वक आयोजन आणि उत्तम नियोजन करण्यात येते.मराठी भाषेचा विकास या माध्यमातून होईल. कृती करताना विचारांची जोड मिळाली पाहीजे.अशा साहित्य संमेलनातून विचारांना चालना मिळते.मराठी भाषेला आज महत्व प्राप्त करून देण्याची गरज आहे.चांगल्या विचाराने मन प्रगल्भ होते.या प्रसंगी प्रमुख अतिथींनी एक कविता आणि कथाही सादर केली.अध्यक्षीय समारोप करताना प्रियदर्शनी क्रीडा,सांस्कृतिक व व्यायाम
मंडळाचे सांस्कृतिक विभागप्रमुख साहित्यिक दिनकर जोशी यांनी संमेलन आयोजित करण्यामागील भूमिका मांडली.जोशी म्हणाले की,नवे कवी, कथाकार यांना चालना देण्याचे काम मंडळातर्फे करण्यात येते. प्रियदर्शनी क्रीडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी हे या संमेलनाचे आयोजन दरवर्षीच करतात.ते विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवितात.असे उपक्रम हे आवश्यकच आहेत.ज्यामघून शहराचा सांस्कृतिक वारसा जपला जातो.सातत्याने होणा-या अशा विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांवर संस्कार होतात.अशा कार्यक्रमातून घडलेले व्यक्तिमत्व हे राष्ट्राची संपत्ती असते.चांगल्या साहित्याचा,कवितांचा आनंद घेण्याचे काम अशा साहीत्य संमेलनातून केले जाते असे प्रतिपादन विभागप्रमुख साहित्यिक दिनकर जोशी यांनी केले.साहित्य संमेलनाची सुरूवात सानेगुरूजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्ज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शंकर सिनगारे यांनी केले. प्रास्ताविक विनायक मुंजे यांनी करून उपस्थितांचे आभार समन्वयक राजेश कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी विविध शाळांमधून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि मंडळा तर्फे प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.या स्नेह संमेलनात योगेश्वरी नूतन माध्यमिक विद्यालय,योगेश्वरी नुतन प्राथमिक विद्यालय, जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालय,घाटनागनाथ प्राथमिक विद्यालय,न्यू व्हिजन पब्लिक स्कूल,सिनर्जी नॅशनल स्कूल या शाळा सहभागी झाल्या होत्या.

कवि संमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केल्या 175 कविता

कवि संमेलनात विद्यार्थ्यांनी निसर्गावर,आजी-आजोबा,आई-वडील यांचे वरील कविता,कवी कुसुमाग्रज,सुरेश भट यांच्या
कविता,अटल बिहारी वाजपेयी यांच्या हिंदी कविता ‘गीत नया गाता हूँ’,’कदम बढाकर चलना होगा’,बालपणावरील तसेच यावेळी मानसी लुले व श्रावणी निर्मळे यांनी स्वरचित कविता सादर केल्या.संमेलनात विद्यार्थ्यांनी एकूण 175 कविता सादर केल्या.

78 कथांचे सादरीकरण..!

विद्यार्थ्यांनी कथाकथनाच्या कार्यक्रमात त्यांना आवडलेल्या आणि स्वरचित अशा कथा सादर केल्या.त्यामध्ये स्वरा रत्नपारखी हिने साभिनय सादर केलेली ‘राजूचे बील’ ही कथा विशेष भावली.तसेच स्वरा धायगुडे हिने देखील वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ थॉमस अलवा एडिसन यांच्या बालपणीची आणि जीवनकार्यावर आधारित एक कथा सांगितली. विद्यार्थ्यांच्या कथांचे भावविश्व एवढे मोठे होते की,जवळपास 78 बाल कथाकारांनी आपल्या कथा या संमेलनात सादर केल्या.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.