आर्थिकबीड जिल्हामहाराष्ट्र राज्यराजकारण

ना.राम शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करुन आ.भीमराव धोंडे यांनी घेतले १२ को.प.बंधारे मंजुर करुन

आठवडा विशेष | प्रतिनिधी

आष्टी:आ.भीमराव धोंडे यांच्या मागणीला व पाठपुराव्याची दखल घेत राज्याचे जलसंधारणमंत्री
ना. राम शिंदे यांनी आष्टी मतदारसंघातील 12 कोल्हापूरी बंधा-यांना मान्यता दिली आहे.

रस्तेमहर्षी आ.भीमराव धोंडे यांनी आष्टी मतदारसंघाचा गेल्या चार वर्षात सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. रस्ते,वीज,पाणी या मुलभुत गरजांवर भर दिला आष्टी मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न मोठ्याप्रमाणावर मार्गी लावला आहे त्याचबरोबर जलसंधारणाची कामे तत्कालीन जलसंधारणमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे माध्यमातून सोडवली होती.

आज जलसंधारण मंत्री ना.राम शिंदे यांचेकडे आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यातील कोल्हापूरी बंधा-यांना मान्यता मिळावी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. स्वतः आ.भीमराव धोंडे औरंगाबाद येथील महामंडळ कार्यालयात जाऊन व अधिक्षक अभियंता लघु जलसंधारण महामंडळ औरंगाबाद यांना जा.क्र 972/2017 दि.11/11/2017 रोजी तसेच व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औ.बाद यांना दि2/ 2/18 रोजी व ना.राम शिंदे यांना दि 3 /2/2018 रोजी व 358/2018 दि.3/9/2018 या सर्व पत्रव्यवहाराची व पाठपुराव्याची दखल घेत जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांनी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या झालेल्या बैठकीत 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेच्या कोल्हापूरी बंधार्याना मान्यता देण्यात आली महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ निर्णय दि.10 जानेवारी 2019 रोजीच्या आदेशान्वये शिराळ 1 क्र.1कोटी 59 लाख रूपये , धिर्डी 2 क्र. 1 कोटी 36 लाख रु, कोळवाडी शिरुर 2 कोटी 16 लाख रु शिरुर ता. शिरुर 2 कोटी 7 लाख देविनिमगाव 2 क्र.1कोटी 29 लक्ष रु, शिरापूर 1 क्र. 95 लाख 29 हजार रु,नांदुर 2 क्र. 1 कोटी 48 लाख रु,आनंदवाडी 1 क्र. 1 कोटी 40 लाख रूपये ,रुईनालकोल 1 क्र 1 कोटी 72 लाख रु,सराटेवडगाव 1 कोटी 57 लाख रु या बंधा-यांना मंजुरी मिळाली आहे. कोळवाडी व शिरुर या बंधारे दि. 17 /2/ 2014 ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती परंतु काही अडचणीमुंळे ही मान्यता थांबली होती आ.भीमराव धोंडे यानी पाठपुरावा करुन या दोन्ही मान्यता पुर्नजीवीत केल्या आहेत. या बंधा-यांमुळे आष्टी मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल. पाटोदा शिरुर मधील गावतिथे को.प. बंधारे करणार असुन या गावांची अंदाजपत्रके सादर झाली असुन लवकर मान्यता मिळणार असल्याचेही आ. भीमराव धोंडे यांनी पञकारांशी बोलताना सांगितले .

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.