सोयगाव,ता.२२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
फर्दापूर(ता.सोयगाव)येथील अनधिकृत वाळू पट्ट्यांवर घातलेल्या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या वाळूचा शुक्रवारी सोयगाव तहसील कार्यालयात बोली पद्धतीत लिलाव करण्यात आला.या लिलावातून सोयगाव तहसील कार्यालयाला तीन लाख महसूल मिळाला असून जप्त करण्यात आलेल्या वाळूपैकी पन्नास ब्रास वाळू गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना मोफत देण्याचा निर्णय घेण्यात येवून सोयगाव पंचायत संमिती कार्यालयाला पन्नास ब्रास वाळू मोफत ताब्यात देण्यात आल्याचा निर्णय तहसीलदार प्रवीण पांडे यांनी घेतला.
फर्दापूर परिसरात विविध ठिकाणी घालण्यात आलेल्या महसूल पथकाच्या छाप्यात १४० ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला होता.या वाळूचा शासकीय लिलाव करण्यात आला या लिलावात बोली पद्फ्हात वापरून तीन लाखात हा लिलाव देण्यात आला असून त्यापैकी पन्नास ब्रास वाळू हि गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय तहसीलदार प्रवीण पांडे यांनी घेवून पन्नास ब्रास वाळू पंचायत समितीच्या ताब्यात देण्यात आली आहे,अवकाळी पावसाच्या संकटात सापडलेल्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना अद्यापही वाळू मिळत नसल्याने या लाभार्थ्यांना वाळूअभावी योजनेचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अडचणी येत असल्याने तहसीलदार प्रवीण पांडे यांनी जप्त करण्यात आलेल्या वाळूमधील पन्नास ब्रास वाळूचा हिस्सा या लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवून पंचायत समिती कार्यालयाला या वाळूचा ताबा दिला असून लाभार्थ्यांना मोफत वाळू वितरण करण्याचे पत्र या कार्यालयाला देण्यात आले आहे.