मुंबई:आठवडा विशेष टीम―विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा सुरू झालेला घोळ राज्याच्या राजकारणाला अधोगतीला नेऊन संपावलेला दिसत आहे.काल रात्री १० वाजेपर्यंतच्या महाराष्ट्रातील महाशिवआघाडीच्या बातम्या लक्षात घेता आज सकाळी ५.४७ वाजता महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात येते काय? आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस व अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सकाळी ८ वाजता होतो हे सर्व अनाकलनीय तर आहेच; परंतु सत्ता स्थापनेकरिता विधानसभा सदस्यांच्या सह्या असलेल्या शपथ पत्राची मागणी करणारे बाहुले राज्यपालांची कीव करावी तेवढी कमीच आहे आणि ज्यांनी हे घडविले त्यांनी राज्याचे राजकारण अधोगतीकडे नेलेले आहे.अशा पध्दतीने राज्याच्या जनतेला कलंकित करीत असलेल्यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. या पद्धतीच्या राजकारणाचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य तीव्र निषेध करीत आहे.आणि असे आवाहन करीत आहे की,ज्या शिवसेना काँग्रेस,राष्ट्रवादी व इतरांना विधानसभा सदस्य म्हणून जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे.त्यांनी राज्यपालांने स्थापन केलेल्या या तथाकथित सरकारला विधानसभेमध्ये बहुमत दाखल करतेवेळी पराभूत करावे.