अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाशैक्षणिक

केंद्रिय माध्यमिक शिक्षा बोर्डाकडून न्यु व्हिजन पब्लिक स्कुलला सीबीएसईचे 11 व 12 वी वर्ग सुरू करण्यास मान्यता―संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी यांची माहिती

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील श्री.बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यु व्हिजन पब्लिक स्कुलला नुकताच केंद्रिय माध्यमिक शिक्षा बोर्ड,दिल्ली (सि.बी.एस.ई.) यांचा उच्च माध्यमिक विद्यालय हा दर्जा प्राप्त झाला असून त्यामुळे आता सीबीएसई अभ्यासक्रमाचे इयत्ता 11 व 12 वी वर्ग सुरू करण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.

न्यु व्हिजन पब्लिक स्कुलला मिळालेला हा दर्जा 1 एप्रिल 2019 पासुन कार्यान्वित झाला आहे.इयत्ता 11 वी या वर्गाचे नियमित वर्ग सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार सुरू आहेत. हे विद्यार्थी त्यांची इयत्ता 12 वी वर्गाची परिक्षा मार्च-2021 मध्ये सीबीएसई अभ्यासक्रमानुसार देतील हा दर्जा प्राप्त करणारी न्यु व्हिजन पब्लिक स्कुल ही अंबाजोगाईतील पहिलीच शाळा आहे.विद्यार्थी,पालक,शिक्षक आणि संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेविषयी आस्था असणा-या सर्वांच्या दृष्टीने ही खुप अभिमानास्पद बाब आहे.
2003 साली बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यु व्हिजन पब्लिक स्कुलला सीबीएसई अभ्यासक्रमानुसार इंग्रजी शाळा सुरू करण्यास केंद्रिय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिल्ली यांनी मान्यता दिली होती.त्यानंतर 2004 साली सदर शाळा ही अंबाजोगाईतील गुरूवार पेठ या ठिकाणी सुरू करण्यात आली. सलग तीन वर्षे या ठिकाणी शाळा सुरू होती.विद्यार्थी व पालकांचा वाढता प्रतिसाद मिळाल्याने सदरील शाळा ही शहरा लगत असणा-या रिंगरोड नजीकच्या मोदी लर्निंग सेंटर या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले.शाळेचे वैशिष्ट्य असे की, सलग 8 वर्षे शाळेचा निकाल शंभर टक्के असा लागलेला आहे.त्या सोबतच सहावी ते दहावी पर्यंत आयआयटी,नीट, जेईई स्पर्धा परिक्षेचे फाऊंडेशन क्लासेस वर्ग या शाळेत घेण्यात येतात.तसेच इयत्ता 11 वी व 12 वीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची होरायझन अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून स्पर्धा परिक्षेची तयारी करून घेतली जाते.होरायझन अ‍ॅकॅडमीचे चार विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी तर दोन विद्यार्थी एनआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.न्यु व्हिजन पब्लिक स्कुल ही इंग्रजी माध्यमाची शाळा असली तरी त्यातून भारतीयत्वाचे शिक्षण देवून विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कार केले जातात.न्यु व्हिजन पब्लिक स्कुलला सीबीएसईचा उच्च माध्यमिक विद्यालयाचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी, मार्गदर्शक प्राचार्य डॉ.बी.आय. खडकभावी,डॉ.डी.एच.थोरात, प्रा.वंतसराव चव्हाण,संस्थेचे अध्यक्ष भूषण मोदी,संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी, शाळेचे प्राचार्य रोशन नायर या सर्वांचे अभिनंदन होत आहे.

न्यु व्हिजन हे दर्जेदार इंग्रजी शिक्षण व भारतीय संस्काराचे केंद्र-राजकिशोर मोदी

अंबाजोगाईत मुंबई पुणे,नागपुर व औरंगाबादच्या धर्तीवर इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी न्यू व्हिजन पब्लिक स्कूल सुरू केले.सतत आठ वर्षे 100% निकालाची परंपरा कायम ठेवून संस्थेने गुणवत्ता जोपासली आहे.आज या संस्थेचे माजी विद्यार्थी हे देशात व परदेशात मोठमोठ्या पदांवर काम करीत आहेत.ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शैक्षणिक क्षेञात अंबाजोगाई पॅटर्न निर्माण केला आहे.नर्सरी.,एल.के.जी.,यु.के.जी.,इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. अनुभवी व समर्पित शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास,सुसज्ज ग्रंथालय, ऑडिओ व्हिज्युअल क्लासरूम, अत्याधुनिक प्रयोगशाळा, वायफाय परिसर,भाषा विषयक प्रयोगशाळा,गणित व विज्ञान प्रयोगशाळा,ई-लर्निंगद्वारे प्रशिक्षण,प्रत्येक वर्गात सिसिटीव्ही कॅमेरा,कला, हस्तकला,नृत्य,संगीत,कराटे प्रशिक्षण,पुर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी आद्ययावत इमारत,बास्केटबॉल ग्राउंड, प्रशस्त मैदान,स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंञ वर्ग आहेत.या वर्गातील सातत्यपुर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नीट,जेईई या सोबतच स्पर्धा परिक्षेसाठी यश मिळविला येते.सुसज्ज वसतीगृह,प्रत्येक खोलीत प्रसाधनगृह,प्रत्येक खोलीत चार विद्यार्थी,संतुलित व पोषक आहार,दैनंदिन योगा आणि व्यायाम.सकाळी व संध्याकाळी अभ्यासवर्ग,अनुभवी व काळजीवाहक कर्मचारी वृंद, लाँड्री सुविधा,मुलींसाठी स्वतंञ सुविधा (सिसीटिव्ही खाली देखरेख),24 तास वैद्यकिय व विद्युत सुविधा या सोबतच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत,स्पर्धेत विद्यार्थी यशस्वी झाला पाहिजे याकरीता जे-जे करता येईल ते सर्वच सर्वोत्कृष्ट देण्याचा आमचा प्रयत्न आसल्याचे सांगुन गतवर्षी पासूनच संस्थेने सीबीएसई 11 वी विज्ञान वर्ग सुरू केले आहेत.अशी माहिती संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.न्यु व्हिजन पब्लिक स्कुलच्या यशस्वी वाटचालीत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी, डॉ.डी.एच.थोरात,प्रा.वसंतराव चव्हाण,संस्थेचे अध्यक्ष भूषण मोदी,कार्यकारी संचालक संकेत मोदी आदींसहीत प्राचार्य,शिक्षक वृंद व पालक आणि विद्यार्थ्यांचे योगदान आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.