एरंडोल:आठवडा विशेष टीम―उत्राण तां. एरंडोल येथील एरंडोल पंचायत समिती चे विद्यमान उपसभापती व शिवसेना गटनेते श्री.अनिल रामदास महाजन यांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर वॉर्ड नंबर ४ ला होवू घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना प्रेरित परिवर्तन पॅनल कडून श्री. अमोल गोविंदा महाजन यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सदर ग्राम पंचायत सदस्य पदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून गावात शांतता व सुव्यवस्था कायम असावी म्हणून निवडणूक न होवू देता बिनविरोध निवडीसाठी पंचायत समिती उपसभापती व परिवर्तन पॅनल प्रमुख अनीलभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाने सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच परिवर्तन पॅनल च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून निवडणूक न होवू देता एका उच्चशिक्षित योग्य तरुणाला संधी देवून एक आदर्श परिसरात निर्माण केला आहे. निवडी बद्दल अमोल महाजन यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. बिनविरोध निवडीबद्दल नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अमोल महाजन यांनी सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देवून सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले