ब्रेकिंग न्युज

दुग्धव्यवसायाने शेतकर्‍यांच्या जीवनात अर्थक्रांती घडेल―मंचकराव पाटील

शिरुर ताजबंद:आठवडा विशेष टीम―दि.२६ नोव्हेंबर रोजी उमरगा यल्लादेवी सोसायटी कडून लातूर जिल्हा बँकेमार्फत शेतकर्‍यांना दुभती जनावरे वाटप प्रंसगी जिपचै गटनेते मंचकराव पाटील यांनी दुग्धव्यवसायाने शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडेल असे सांगीतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा यल्लादेवी संस्थेचे चेअरमन राजकुमार सोमवंशी ,प्रमुख पाहुणे जिपचे गटनेते मंचकराव पाटील,तालुका फिल्ड ऑफिसर रामदास देशुमख,शाखा तपासनीस श्री अतुलजी देशमुख, पी.जी.चाकूरकर , शाखा व्यवस्थापक बी.आर.वलसे ,उपसरपंच रामप्रसाद सोमवंशी,गटसचिव नारायण कांबळे ,गोविंदराव सूर्यवंशी उपस्थित होते.
उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना पाटील यांनी सांगितले की , आज दुभती पशु विकत घेण्यासाठी उमरगा यल्लादेवी सोसायटी चेअरमन राजकुमार सोमवंशी यांच्या प्रयत्नाने बँकेमार्फत वाटप होत आहे याचा शेतकर्‍यांनी फायदा घेवून पशुंचा व्यवस्थित सांभाळ करावा. उत्पादित दुध अगोदर घरातील मुलांसह सर्व सदस्यांना देवून शिल्लक राहीलेले दुध डेअरीला घातले तर घरात समाधान लाभून संसाराकरिता आर्थिक मदत मिळेल असे सांगितले.
यावेळी मधुकर सोमवंशी ,हानमंत सोमवंशी,रामप्रसाद सोमवंशी,धनाजी सोमवंशी,पंढरी श्रीमंगले,अमोल सोमवंशी,अंतराम सोमवंशी,सोपान शेवाळे.समाधान सोमवंशी,बालाजी सप्रे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.प्रास्तविक फिल्ड रामदास देशमुख यांनी केले सुत्रसंचलन सय्यद यांनी तर अध्यक्षीय समारोप चेअरमन सोमवंशी यांनी केले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.