सोयगाव:शहरात चोरी,१६ हजाराची रोकड लंपास

सोयगाव,ता.२७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
शहराच्या विविध भागात बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी तीन ठिकाणी घरे फोडण्याचा प्रयत्न करून प्राध्यापक कॉलनी भागातील डॉ.दिनकर पिंगाळकर यांच्या घराच्या खिडकीचे कुलूप तोडून खिडकीतून लांब काठीने घरातील पँट व त्यांच्या पत्नीची पर्स काढून त्यातून अंदाजे १८ हजार रु रोकड लांबविण्यात चोरट्यांना यश आले आहे.या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
शहराच्य आमखेडा भागाला लागून असलेल्या रामकृष्ण नगर,शकुंतला नगर,प्राध्यापक कॉलनी या भागात असलेल्या विजय पगारे,प्रा.गणेश काळे यांच्या घरात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला,परंतु या ठिकाणी त्यांना यश न आल्याने त्यांनी डॉ.दिनकर पिंगाळकर यांच्या खिडकीचे तावदाने तोडून खिडकीत आकडा टाकून घरातील पँट व त्यांच्या पत्नीची महिला पर्स आकड्यात अटकवून त्यातील १८ हजार रु मुद्देमाल लांबविला आहे.या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत फिर्यादीअभावी गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.दरम्यान एकाच रात्री तीन ठिकाणी धाडसी चोरीचा प्रयत्न चोरट्यांचा फसला असून चोरीच्या घटनेच्या माहितीवरून सोयगाव पोलीस या भागात सतर्क झाले आहे.
शहरातील विविध भागात चोरीच्या घटनेच्या माहितीवरून सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी परिसराची पाहणी करून घटनेची माहिती घेतली आहे.शहरात पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.