पाटोदा तहसिलच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना मिळेणात विविध प्रमाणपत्र
पाटोदा: गणेश शेवाळे― महसूल विभागाकडून दिले जाणारे जात आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, रहिवाशी,उत्पन्न तसेच अनेक प्रमाणपत्र काढण्यासाठी महाआॅनलाईन पद्धत शासनाने सुरुवात केली असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत जास्त माहिती नसल्यामुळे पाटोदा तहसिल मध्ये गोंधळ उडाला आहे. सध्या विविध खात्यात नोकर भरतीच्या जागा निघाल्या असून याचे फॉर्म भरण्यासाठी विविध प्रमाणपत्र लागतात यामुळे पाटोदा तालुक्यातील पालक व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असणारे उत्पन्न, रहिवाशी, वय, अधिवास, जात, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र महसूल विभागाकडून दिले जातात. २०१५ च्या शासन निर्णयानुसार ही सर्व प्रमाणपत्रे आॅफलाइन ऐवजी आॅनलाइन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीने द्यावे असा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार सध्या तहसील मधून सर्व प्रमाणपत्रे महा आॅनलाईन पोर्टलवरून आॅनलाइन दिली जातात माञ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाहीत यांचाच फायदा दलाल लोक घेत असुन तुमचे प्रमाणपत्र लवकर काडून देतो म्हणून विद्यार्थी व पालकाची आर्थिक लुट करत आहेत यामुळे तहसील कार्यालयात अनेक फाईली पडून असून सेतु व तहसील कार्यालयाकडे पालक, विद्यार्थी हेलपाटे मारून परेशान आहेत. कोणते तरी कारण सांगुन सेतु वाले वापस करतात. काही दलाल आर्थिक लुट करून पोळी भाजून घेतात.सध्या शासनाची नोकर भरतीच्या अनेक जागा निघल्याने प्रमाणपञ काडुण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबघ चालु असुन विविध प्रमाण पञासाठी गर्दी होत आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करित आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून विद्यार्थ्यांना लवकर प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.