बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारण

अशी होती पंकजाताईची अनमोल कामगिरी, जाता जाता फक्त बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री सडक योजनेतुन मंजुर केले 300 कोटीचे रस्ते

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने न भुतो न भविष्यति होवुन गेली. साऱ्या महाराष्ट्राचा निधी जणु काही फक्त बीड जिल्ह्यासाठीच येत होता असं चित्र आता समोर येत असुन आचारसंहिता लागण्यापुर्वी संपुर्ण बीड जिल्ह्यातील रस्ते ज्याची लांबी 500 कि.मी.हे चांगले करण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत 300 कोटी रूपये मंजुर करून ठेवले.ज्या कामाला प्रशासकिय मान्यता मिळाली असुन 05 डिसेंबरच्या आत निविदा ओपन होणार आहेत. जिल्ह्यात पुन्हा काम नवे घेण्यासाठी मिळणार नाही एवढा अनुशेष त्यांनी भरून काढला. राजकिय झालेल्या नुकसानीचे परिणाम लोकांना लवकरच दिसतील हे मात्र नक्की.तेव्हा कुठं पश्चातापाची वेळ येवु नये....
या जिल्ह्यासाठी पंकजाताईंनी जे करून ठेवलं आणि धाडसानं करून दाखवलं ते कुठल्याही पालकमंत्र्याला यापुर्वी जमलेलं नाही. विकासकामाचा महाइतिहास त्यांनी जिल्ह्यात घडवला आहे. त्यांनी आणलेल्या विकासनिधीला विरोधकांनाही सलाम करावा लागेल अशी त्यांची धाडसी कामगिरी होती. विकासाची पुण्याई एवढी करून ठेवली की खऱ्या अर्थाने पुन्हा हा सुवर्णकाळ जिल्ह्यासाठी कधी येणार याची वाट पाहणे एवढेच. ग्रामविकास खाते त्यांच्याकडे होते.जिल्ह्यात 800 कोटी जवळपास पाच वर्षात रस्त्यासाठी आणले.आचारसंहिता लागण्यापुर्वी त्यांनी बीड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात ग्रामीण भागातील जेवढे रस्ते आहेत त्या सर्व कामाचे अंदाजपत्रक तातडीने मागवुन घेतले आणि जाता जाता जवळपास 300 कोटी कामाची रस्ते मंजुर केले.ज्याला प्रशासकिय मान्यता मिळालेली आहे. खरं पाहता निविदा प्रक्रिया तात्काळही झाल्या असत्या.पण निवडण्ाुका लागल्या आणि आचारसंहितामुळे प्रक्रिया पुर्ण झाली नाही. मागे-पुढे न बघता किंवा अंदाजपत्रक इतर प्रक्रिया न बघता नुसती शिफारस आलेले रस्ते सुद्धा यादीत मंजुर झालेले आहेत. खऱ्या अर्थाने आता बीड जिल्ह्यात पुन्हा रस्त्याचे काम नव्याने घ्यायचे झाल्यास रस्ता लांबी ग्रामीण भागात शिल्लकच ठेवलेली नाही. सत्तापेचाच्या गोंधळामुळे या कामाच्या निविदा जाहिर होवुन सुद्धा प्रशासकिय पातळीवर ओपन झाल्या नसल्या तरी आता पुन्हा 05 डिसेंबर टेंडर ओपनींगसाठी आहे. यामध्ये नव्या सरकारने काही आडकाठी घातली नाही तर ही कामे ओपन होतील आणि वर्कऑर्डर नुसार कामे चालु होतील. मात्र नविन सरकारचं धोरण, विकासकामा वरची काटकसर अशा अनेक प्रकारची यामध्ये अडथळे आले नाही तर 300 कोटीचा लॉट रस्त्याचा मार्गी लागेल ही पुण्याई केवळ माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचीच आहे. माझा जिल्हा हे समज्ाुन त्यांनी अहोरात्र फक्त विकासनिधी आणण्यासाठी एक-एक क्षण खर्च केला. असा पालकमंत्री पुन्हा जिल्ह्याला मिळेल का?आणि मिळाला तर विकासनिधी आणण्याची एवढी हिंमत आणि धाडस असणारा असेल का?असे अनेक प्रश्न येणाऱ्या काळात निश्चित पुढे येतील.सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की, पंकजाताई यांची पुण्याई किती मोठी बीड जिल्ह्याच्यासाठी राहिली हे एका प्रश्नावरून लक्षात येते. अन्य विकास योजना त्यांनी मंजुर केल्या आणि कार्यान्वित झाल्या. याचं वर्णन आणि आकडे शब्दात मोजणे तेवढं कमीच आहे. वास्तव सत्य असलं तर अनेकदा त्याची किंमत कळत नाही आणि वास्तव पडद्याआड झालं की मग होत असलेलं नुकसान आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात हे मात्र नक्की.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.