अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

इनरव्हील क्लब अंबाजोगाई तर्फे मुलींची मोफत दंत तपासणी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―येथील इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाई यांच्या वतीने जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे 100 मुलींची दंत आणि रक्त तपासणी करून मुलींना परिपुर्ण आहार विषयक माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाईच्या अध्यक्षा सुहासिनी मोदी,सचिव अंजली चरखा,मार्गदर्शक डॉ.नयन लोमटे,डॉ.गौरी कुलकर्णी यांची उपस्थिती होती.यावेळी डॉ.नयन लोमटे यांनी हिरव्या पालेभाज्या व फळे भरपुर प्रमाणात सेवन करा,जंक फुड खाऊ नये असे सांगितले.आपल्या दातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी काहीही खाल्यानंतर चुळ भरणे व सकाळी आणि रात्री दोन वेळा ब्रशने व्यवस्थित दात स्वच्छ करणे या बाबत सांगितले.डॉ. गौरी कुलकर्णी यांनी आहारा विषयक माहिती दिली.100 मुलींची रक्त तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अंजली चरखा यांनी केले.तर उपस्थितांचे आभार अध्यक्षा सुहासिनी मोदी यांनी मानले.यावेळी इनरव्हील सदस्या मनिषा बडेरा, वर्षा देशमुख यांची उपस्थिती होती.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    मतिमंद विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

    इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाईच्या वतीने धानोरा येथील सेवा मतिमंद विद्यार्थ्यांचे निवासी शेतकी पुनर्वसन शिक्षण प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी मतिमंद विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात येवून संस्थेस कुकर भेट देण्यात आला. यावेळी इनव्हीलच्या अध्यक्षा सुहासिनी मोदी,सचिव अंजली चरखा,सदस्या सरिता जाजू, वर्षा देशमुख,शिवकन्या सोळंके, सुवर्णा बुरांडे,रेखा देशमुख, सुनिता कात्रेला,अंजली रेवडकर,किरण आसरडोहकर, शोभा रांदड,अर्चना मुंदडा यांच्यासह संस्थेचे सचिव दिनकर गुणाले, मुख्याध्यापक मनोज यवले,राम पन्हाळे,विजय इस्थळकर,बिभीषण पौळ, अमोल शिंदे,नृसिंह कांबळे, रोहिणी मालीशे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज येवले यांनी करून आभार मानले.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.