अंबाजोगाई तालुकाखेळबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यशैक्षणिक

न्यु व्हिजन पब्लिक स्कुल मध्ये 10 वा क्रीडा महोत्सव थाटात संपन्न

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यु व्हिजन पब्लिक स्कुलमध्ये शनिवार,दि. 30 नोव्हेंबर रोजी 10 वा क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.क्रीडा महोत्सवाची सुरूवात श्री.योगेश्‍वरी मंदीर येथून डॉ.डी.एच.थोरात यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून ती ज्योत शाळेचा क्रीडा सचिव अभिजीत घुले याच्याकडे देण्यात आली.योगेश्‍वरी मंदीरापासुन ते शिवाजी चौक, आंबेडकर चौक,भगवानबाबा चौक मार्गे न्यु व्हिजन मैदानावर हेड बॉय आणि हेड गर्ल तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी ती क्रीडा ज्योत धावत परत आणली.

क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून बी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.प्रद्दुम्न इगे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.डी.एच.थोरात हे होते. यावेळी दिपप्रज्ज्वलन व प्रतिमापुजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड जोपासली जावी व त्यांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येतो.या महोत्सवात शाळेतील चार हाऊस मध्ये 100 मी धावणे,200 मी धावणे,400 मी धावणे,600 मी धावणे,800 मी धावणे,लांब उडी,उंच उडी थाळीफेक,गोळाफेक,भाला फेक,खो-खो,कबड्डी, व्हॉलीबॉल,लहान विद्यार्थीसाठी लिंबू-चमचा,दोरीवरच्या उड्या,सॅक रेस,तीन पायाची शर्यत,फ्रॉग जम्प इत्यादी स्पर्धांचा या क्रीडा महोत्सवा समावेश होता.क्रीडा महोत्सवाच्या सांगता समारंभात डॉ.डी.एच.थोरात यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर पारितोषिक वितरण करण्यात आले.सिनियर चॅम्पीयन म्हणुन अमन राठोड,समृद्धी पाथरकर तर ज्युनियर चॅम्पीयन म्हणुन भक्ती किर्दंत,आर्यन राठोड व हर्ष वाघमारे विजेते ठरले.चार हाऊसमध्ये आकाश हाऊस हे विजेते ठरले या हाऊसला जास्त गुण मिळाले.क्रीडाध्वज उतरवून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.संस्थेचे अध्यक्ष भूषण मोदी,कार्यक्रारी संचालक संकेत मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य रोशन नायर,शिवकांत बेटगेरी,दत्तराज कुलकर्णी,सौ. परमप्रिया गायकवाड,क्रिडा शिक्षक विष्णु मुंडे,शशांक शाहु, उमेश दिनकर व सर्व न्यु व्हिजन स्टाफ या सर्वांनी महोत्सवाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी क्रीडा महोत्सव-राजकिशोर मोदी

अंबाजोगाईत मुंबई पुणे,नागपुर व औरंगाबादच्या धर्तीवर इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी न्यू व्हिजन पब्लिक स्कूल सुरू केले.सतत आठ वर्षे 100% निकालाची परंपरा कायम ठेवून संस्थेने गुणवत्ता जोपासली आहे.आज या संस्थेचे माजी विद्यार्थी हे देशात व परदेशात मोठमोठ्या पदांवर काम करीत आहेत.ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शैक्षणिक क्षेञात अंबाजोगाई पॅटर्न निर्माण केला आहे.नर्सरी.,एल.के.जी.,यु.के.जी.,इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. अनुभवी व समर्पित शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास,सुसज्ज ग्रंथालय, ऑडिओ व्हिज्युअल क्लासरूम, अत्याधुनिक प्रयोगशाळा, वायफाय परिसर,भाषा विषयक प्रयोगशाळा,गणित व विज्ञान प्रयोगशाळा,ई-लर्निंगद्वारे प्रशिक्षण,प्रत्येक वर्गात सिसिटीव्ही कॅमेरा,कला, हस्तकला,नृत्य,संगीत,कराटे प्रशिक्षण,पुर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी आद्ययावत इमारत,बास्केटबॉल ग्राउंड, प्रशस्त मैदान,स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंञ वर्ग आहेत.या वर्गातील सातत्यपुर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नीट,जेईई या सोबतच स्पर्धा परिक्षेसाठी यश मिळविला येते.सुसज्ज वसतीगृह,प्रत्येक खोलीत प्रसाधनगृह,प्रत्येक खोलीत चार विद्यार्थी,संतुलित व पोषक आहार,दैनंदिन योगा आणि व्यायाम.

सकाळी व संध्याकाळी अभ्यास वर्ग,अनुभवी व काळजीवाहक कर्मचारीवृंद, लाँड्री सुविधा,मुलींसाठी स्वतंञ सुविधा (सिसीटिव्ही खाली देखरेख),24 तास वैद्यकिय व विद्युत सुविधा या सोबतच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत,स्पर्धेत विद्यार्थी यशस्वी झाला पाहिजे याकरीता जे-जे करता येईल ते सर्वच सर्वोत्कृष्ट देण्याचा आमचा प्रयत्न आसल्याचे सांगुन गतवर्षी पासूनच संस्थेने सीबीएसई 11 वी विज्ञान वर्ग सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी गेल्या 9 वर्षांपासुन क्रीडा महोत्सव घेण्यात येतो.अशी माहिती संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.न्यु व्हिजन पब्लिक स्कुलच्या यशस्वी वाटचालीत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. आय.खडकभावी,डॉ.डी.एच. थोरात,प्रा.वसंतराव चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष भूषण मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी आदींसहीत प्राचार्य,शिक्षकवृंद व पालक आणि विद्यार्थ्यांचे योगदान आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.