अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―महाराष्ट्रात झालेल्या परतीच्या पावसाने कापसाची प्रत घसरली असून उताराही घटल्याने खाजगी बाजारात कापसाचे दर कमी झाले होतेे.शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक व नुकसान होवू नये म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने 27 नोव्हेंबर पासून शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरु केली आहेत.बीड जिल्ह्यात माजलगाव येथे नुकतेच खरेदी केंद्र सुरु केल्यानंतर आज सोमवार,दि.2 डिसेंबर रोजी परळी वैजनाथ आणि केज तालुक्यात मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके दिली आहे.
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील धर्मापुरी येथील एस.के.जिनिंग अँड प्रेसिंग येथे आज सोमवार,दि.2 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक राजकिशोर मोदी,राज्य उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके, संचालक भारतराव चामले, परळी वैजनाथ कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. गोविंदराव फड यांचे प्रमुख उपस्थितीत आणि केज तालुक्यात कुंबेफळ येथे व्यंकटेश जिनिंग अँड प्रेसिंग येथे आज सोमवार,दि.2 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर,महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक राजकिशोर मोदी,राज्य उपाध्यक्ष अॅड. विष्णुपंत सोळंके,संचालक भारतराव चामले तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ होणार आहे.तरी या कार्यक्रमास कापुस उत्पादक शेतकर्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.याबाबत बोलताना राज्य उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके म्हणाले की,परळी वैजनाथ तालुक्यातील धर्मापुरी परिसरात सुमारे 50 कि.मी.अंतरावर शासकीय कापुस खरेदी केंद्र नव्हते.ते तात्काळ सुरू करावे अशी मागणी संचालक व बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी पणन महासंघाकडे केली होती.त्यांचे मागणीनुसार परळी वैजनाथ तालुक्यातील धर्मापुरी येथे
शासकीय कापुस खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहे.कापूस भिजल्याने व्यापार्यांनी दर कमी केले.तसेच सरकारने खरेदी केंद्र सुरु केले नव्हते.त्यामुळे अनेक शेतकर्यांना खाजगी बाजारात आपला कापूस विकावा लागला. त्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.ही बाब लक्षात आल्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालकांनी तात्काळ प्रधान सचिव (पणन) अनुप कुमार यांची भेट घेतली व कापूस केंद्र लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात चर्चा केली होती.त्यानुसार पणन महासंघाने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला. राज्यात बुधवार,दि.27 नोव्हेंबर पासून टप्याटप्याने 45 खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी या केंद्रांवरच आपला कापूस विक्री करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके व संचालक राजकिशोर मोदी यांनी केले आहे.
शेतकर्यांनी आपला कापूस पणन महासंघाचे केंद्रांवर विक्रीस द्यावा
27 नोव्हेंबर पासून राज्यात 45 शासकीय कापूस खरेदी केंद्र टप्याटप्याने सुरु करण्यात येत आहेत.तेव्हा शेतकर्यांनी कापूस वाळवून आणावा.12 टक्क्यां पर्यंत आर्द्रता असलेला कापूस खरेदी करण्यात येणार आहे. यावर्षी 28 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील पहीले कापुस खरेदी केंद्र हे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे सुरू झाले आहे. कापसाला प्रती क्विंटल रूपये 5550/- रूपये भाव देण्यात येत आहे.याची नोंद बीड जिल्ह्यातील कापुस उत्पादक शेतकर्यांनी घ्यावी―अॅड.विष्णुपंत सोळंके (उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ)