बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणराष्ट्रीय

पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट सर्वत्र गाजली ; ट्विटर टेंड्रींगमध्ये देशात टाॅप थ्री

१५ हजाराहून अधिक लाईक्स, अडीच हजारापेक्षा जास्त कमेंटस् ; जनतेलाही भूमिका आवडली!

मुंबई दि. ०२ :आठवडा विशेष टीम― भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आज दिसून आला. सोशल मिडियावर त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट सर्वच प्रसार माध्यमांमध्ये चांगलीच गाजली, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात याचाच बोलबाला होता. 'हॅशटॅग पंकजा मुंडे' हा ट्विटर ट्रेंडही देशात टाॅप थ्री वर पहायला मिळाला. दरम्यान, त्यांची भूमिका जनतेलाही पसंत पडल्याचे यावरून लक्षात येते.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी एक फेसबुक पोस्ट करून येत्या १२ डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी जनता व कार्यकर्त्यांशी संवाद साधून, पुढे काय करायचे? याविषयी संवाद साधणार असल्याचे सुचित केले होते. 'नाही तरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे? असं सांगून तुमच्याशी मनसोक्त बोलणार असल्याचे म्हटले होते. ही पोस्ट काल त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर आल्यानंतर बघता बघता प्रचंड वेगाने व्हायरल झाली. सोशल मिडियाबरोबरच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियाने देखील याची दखल घेतली. काल सकाळपासून या पोस्टवर १५ हजाराहून अधिक लाईक्स, अडीच हजारापेक्षा जास्त कमेंटस् आल्या तर फेसबुकच्या माध्यमातून सुमारे पावणे तीन लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचला. ही पोस्ट एवढी गाजली की आज दिवसभर सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी हाच विषय घेऊन चर्चा घडवून आणली, एवढेच काय, राज्यातील भाजपसह अन्य पक्षाच्या नेत्यांनाही यावर भाष्य करावे लागले.

  ट्विटर ट्रेंड टाॅप थ्री वर

  पंकजा मुंडे यांची पोस्ट केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात गाजली. आज संपूर्ण देशभरात ज्या काही घडामोडी झाल्या आणि त्याची सोशल मिडियामध्ये चर्चा झाली, त्यात 'हॅशटॅग पंकजा मुंडे' हा ट्विटर ट्रेंडही देशात टाॅप थ्री वर पहायला मिळाला.

  अभिनंदनाच्या ट्विटला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा प्रतिसाद

  पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे ट्विट करून अभिनंदन केले होते, त्या ट्विटला ठाकरे यांनी देखील प्रतिसाद देत त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना सुध्दा उजाळा दिला. " आपले मनःपूर्वक धन्यवाद पंकजाताई मुंडे! 'राज्याचे हित प्रथम ' याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो " असं ट्विट उध्दव ठाकरे यांनी केले आहे.


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.