अहमदनगर जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमी

नेवासफाटा: छञपती युवासेनेने चक्क बांधकाम खात्याचीच रस्त्यावर काढली प्रतिकात्मक प्रेत याञा

नेवासाफाटा - शेवगांव राज्यमार्गाची दुरावस्था !

रस्ता दुरुस्ती न केल्यास बांधकाम खात्याच्या कार्यालयात दशक्रिया विधी करणार - कमलेश नवले

नेवासा:आठवडा विशेष टीम―
नेवासाफाटा - शेवगांव रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आसून रस्त्यात खड्डा की खड्ड्यातून रस्ता असा पेचप्रसंग निर्माण झालेला आसल्याने छञपती युवा सेना प्रदेश संघटक कमलेश नवले यांनी रस्ता दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता.बांधकाम विभागाने दखल न घेतल्यामुळे सोमवार (दि.२) रोजी सकाळी ९ वाजता छञपती युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने चक्क बांधकाम खात्याचीच प्रेत याञा काढून बांधकाम खात्याच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत रस्त्याच्या कडेलाच अग्नीडाव देवून अनोखे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाप्रसंगी नेवासा पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार बाळासाहेब घुगरकर यांनी आंदोलन करर्त्यांना संयममाने आंदोलन करण्याची विनंती केली. हा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे रस्त्यात अपघात होवून अनेकांना कायमचे अधू होण्याचे वेळ येत आसतांना बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेत आसल्याने वाहनधारकांत तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.छञपती युवा सेनेने याबाबत उपोषणाचे निवेदन देवूनही बांधकाम खात्याने दखल घेतली नाही त्यामुळे सोमवारी सकाळी प्रतिकात्मक प्रेत याञा काढल्याने झोपलेल्या बांधकाम खात्याला जाग आली यावेळी आंदोलन कर्त्यांना रस्त्याचे काम करण्यात येईल असे लेखी पञ देण्यात आले.माञ छञपती युवा सेनेचे प्रदेश संघटक नवले म्हणाले की, सात दिवसांत रस्त्याचे काम झाले नाही तर बांधकाम खात्याच्या कार्यालयातच दशक्रिया विधी करु असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.याप्रसंगी प्रदेश उपअध्यक्ष नरेंद्र नवथर,प्रदेश संघटक कमलेश नवले संस्थापक मराठा टायगर छावा ग्रुप महा_राज्य, शरद आरगडे संरपच सौंदाळा,तालुका प्रमुख निलेश कडू,विद्यार्थी आघाडी तालुका प्रमुख कृष्णा नवथर,तालुका उप प्रमुख गणेश नवथर, तालुका सरचिटणीस बाबासाहेब सरकाळे,तालुका अध्यक्ष पप्पू बोधक,तालूका संपर्क प्रमुख अक्षय बोधक,तालुका कार्यध्यक्ष संदेश बोधक डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण अध्यक्ष,ज्ञानेश्वर गव्हाणे शेवगाव तालुका अध्यक्ष,मनोज आरगडे,विजय नवले, विशाल शिंदे,संकेत बोधक भेंडा शहर अध्यक्ष,अविनाश गाडेकर,सागर कोतकर,अक्षय आरगडे, प्रसाद पाटोळे,गणेश आरगडे,सिद्धार्थ आरगडे,चंद्रकात आरगडे,अभिजीत बोधक,नितीन आरगडे,गणेश चित्ते, संदिप लोनकर,संजय बोधक, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.