नांदेड जिल्हाब्रेकिंग न्युज

डॉ.प्रियंका रेड्डी बलात्काराचा निषेध,आरोपींना फाशी देण्याची मागणी

नांदेड:आठवडा विशेष टीम―डॉ.प्रियंका रेड्डी या युवतीवर सामुहिक बलात्कार करुन त्याची हत्या केल्याचा निषेधार्थ जय लहुजी सामाजिक संस्थेच्या वतीने मुक्रमाबाद पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.तर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.गड्डीमे साहेब यांना देण्यात आले.
यावेळी जय लहुजी सामाजिक संस्थेचे मुखेड तालुका अध्यक्ष श्री.राजरत्न गुमडे जय लहुजी सामाजिक संस्थेचे नवी मुंबई अध्यक्ष कु.योगेश अभंग शिंदे साहेब व युवासेना उपतालुका प्रमुख मुखेड श्री.अतुल सुनेवाड , जय लहुजी सामाजिक संस्थेचे मुक्रमाबादचे शहर अध्यक्ष श्री.शशी नवाडे , युवा समाजसेवक श्री.मस्तान तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
हैदराबाद येथील पशू वैद्य चिकीत्सक डॉ.प्रियंका रेड्डी या युवतीवर काही नराधमांनी सामुहिक बलात्कार करुन, तिची हत्या केली. तर सदर युवतीच्या प्रेतास जाळण्यात आले. घडलेला हा प्रकार संपुर्ण मानव जातीस काळिमा फासणारा आहे. आजही महिला व मुली सुरक्षित नसल्याचे या घटनेवरुन अधोरेखित होत आहे. निर्भया नंतर असे प्रकार सातत्याने घडत असून, महिलांवर बलात्कार करणार्‍या नराधमांचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जय लहुजी सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच शहरासह जिल्ह्यात देखील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न भेडसावत असून, अनेक ठिकाणी महिलांची छेडछाडीचे प्रकरण समोर येत आहे. अशा घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलण्यात यावे. तसेच नांदेड प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करुन सामाजिक उपक्रमाद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.