औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव: जरंडी,निंबायतीचे मनोरे चालू होईना,मुख्य व्यवस्थापकाच्या आदेशाला कर्मचाऱ्यांचा खो

सोयगाव,ता.१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील
पंधरा दिवसापासून खंडित असलेल्या भारत संचार निगम ली.ची सेवा सुरळीत करण्याचे आदेश मुख्य व्यवस्थापक औरंगाबाद यांनी सोयगाव-सिल्लोडच्या कर्मचाऱ्यांना देवूनही जरंडी,निंबायती येथील भारत संचार निगम ली.चे बंद झालेले मनोरे अद्यापही चालू होत नसल्याने या भागातील दहा गावांची सेवा पंधरा दिवसापासून ठप्प झाली आहे.या प्रकारामुळे ग्राहक कंटाळले असून ग्राहकांचे मोबाईल कचरा झाले आहे.
तांत्रिक बिघाडाअभावी जरंडी,निंबायती या गावातील बी.एस.एन..एल चे मनोरे पंधरा दिवसापासून बंद अवस्थेत उभे आहे.जरंडीच्या मनोऱ्याला तांत्रिक अडचण आणि निंबायतीच्या मनोऱ्यात मोठा मशिनरी बिघाड झालेला आहे.संबंधित विभागाचे कर्मचाऱ्यांनी अद्यापही हे दोन्ही मनोरे चालू केले नसल्याने ग्रामस्थांनी थेट भारत संचार निगमचे मुख्य व्यवस्थापक बाविस्कर यांना साकडे घातले,परंतु मुख्य व्यवस्थापक यांच्या आदेशालाही बी.एस.एन.एल च्या सोयगाव आणि सिल्लोड विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खो दिला असून अद्यापही हे बिघाड झालेले मनोरे धूळखात पडून आहे.सेवा मिळत नसल्याने ग्राहकांनी दुसऱ्या कंपनीचे सीमकार्ड विकत घेण्याचा सपाटा धरला असून काही ग्राहकांनी सीम पोर्ट करण्याकडे कल दिला असल्याने जरंडी,निंबायती परिसरातील दहा गावे बी.एस.एन.एल मुक्त होत आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    कंपनी आणि बी.एस.एन.एल चा समन्वय नसल्याने संबंधित विभाग देखरेख जबाबदारी देण्यात आलेल्या कंपनीला जबाबदार धरत असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मात्र थेट बी.एस.एन.एल कडे बोट दाखविले असल्याने कंपनी आणि संबंधित विभागात समन्वय नसल्याने हा गोंधळ वाढला आहे.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.