अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

अंबाजोगाईत 45 वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनाचे उद्घाटन

बीड जिल्हयाने जगाला दिली शुन्य ही संकल्पना- शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख

अंबाजोगाई :आठवडा विशेष टीम―

गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती व भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने श्री खोलेश्‍वर प्राथमिक विद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी मंगळवार,दि.3 डिसेंबर 2019 ते बुधवार,दि.4 डिसेंबर 2019 या कालावधी मध्ये प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख म्हणाले की,बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण होवून वैज्ञानिक जाणिवा समृद्ध होत आहेत. आपल्याला वैज्ञानिक व्हायचे आहे.असे विद्यार्थी बालवयापासूनच बोलून दाखवत आहेत.इन्स्पायर अ‍ॅवार्ड जिल्हा प्रदर्शन या बाबतीत मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा अत्यंत चांगली प्रगती करीत आहे.बीड जिल्ह्याने जगाला शुन्य ही संकल्पना दिली आहे. त्यामुळे जगातील विज्ञान व गणित या विषयात मोठी प्रगती झाली आहे.विज्ञान स्विकारल्या शिवाय अज्ञान दुर होणार नाही असे सांगुन अंबाजोगाई शहरातील सुमारे 350 मुले परदेशात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.ही भूषणावह बाब आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत मोबाईल वापरू नयेत असे आवाहन शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी यावेळी केले.

अंबाजोगाईत 45 वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शन-2019-20 आयोजित केले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उदघाटक म्हणून बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापती सौ.मीनाताई भताणे,प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य सावंत, पंचायत समिती सदस्य पटेल, पंचायत समिती सदस्य श्रीमती चामनार,गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत,शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकार, केंद्रप्रमुख बालासाहेब डांगे, भाशिप्र संस्थेच्या स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर,खोलेश्‍वर प्राथमिक विभाग शालेय समिती अध्यक्ष प्रसाददादा चिक्षे,विज्ञान व गणित प्रदर्शन व्यवस्थाप्रमुख बरूरे सर व भाशिप्र संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी आप्पाराव यादव,श्रीमती पठाण के.एम., ज्येष्ठ पत्रकार अ.र.पटेल, पत्रकार अरूण गंगणे,व्यंकटेश चामनर हे मान्यवर उपस्थित होते.

या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यातील 6 वी ते 8 वी गटातुन 62 शाळांनी नोंदणी केली तर 9 वी ते 12 वी 39 व शिक्षक गटातुन 3 शिक्षकांच्या प्रयोगाचे सादरीकरण व प्रदर्शन या निमिताने पाहण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.या विज्ञान प्रदर्शनाच्या ठिकाणी "टिम भोवताल" यांच्या वतीने बालाघाटातील अंबाजोगाईच्या डोंगरदर्‍यातील विविध निसर्ग संपदा,पक्षी यांचे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री खोलेश्‍वर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज.ह.राठोड यांनी सांगितले की,विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान होय व आजची पिढी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारी असावी व आमच्या शाळेला या प्रदर्शनाचे आयोजन करण्याची संधी मिळाली हे आमच्यासाठी अत्यंत आभिमानाची बाब आहे. या प्रसंगी विचारमंचावर उपस्थित उपमुख्यकार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, गटविकास अधिकारी संदीप घोणसीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर यावेळी बोलताना भाशिप्र संस्थेचे सहकार्यवाह प्रा.चंद्रकांत मुळे म्हणाले की, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची मराठवाड्यातील शैक्षणिक वाटचालीमध्ये संस्थेची असणारी भूमिका स्पष्ट केली व संस्थेचे अनेक उपक्रमांची मांडणी शासनस्तरावर स्विकारत असल्याने संस्थेची शैक्षणिक भूमिका प्रा.मुळे यांनी विशद केली.उद्धाटन सत्राचे सुत्रसंचालन सौ.बालीका देशमुख व रा.अ. कुलकर्णी यांनी करून उपस्थितांचे आभार रंगनाथ राऊत (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अंबाजोगाई) यांनी मानले.विज्ञान व गणित प्रदर्शन पाहण्यासाठी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रयोगांचे मान्यवरांनी कौतुक केले.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.