परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

रब्बी २०१९ च्या पंतप्रधान पिक विमा योजने मधून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात दहा जिल्ह्यात पिक विमा भरता येणार नाही वसंतराव मुंडे

परळी:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रात पंतप्रधान पिक विमा रब्बी 2019 या योजनेत बीड जिल्ह्यासह रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर सोलापूर लातूर हिंगोली वाशिम भंडारा असे एकूण दहा जिल्हे पिक विमा योजनेत राबविण्याबाबत स्वतंत्रपणे शासनाला खास बाब कारवाई करण्यासाठी मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी निवेदन दिले आहे केंद्र सरकारच्या वतीने कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव सादर करावा लागतो रब्बी मधील पिकासाठी विविध नमुन्यात नियमानुसार बँकांना शेतकरी पिक विमा स्वतःच्या पिकाचा करीत असतो यासाठी संबंधित कंपनी शासनाकडून नेमलेली असते शेतकऱ्यांचा विमा भरला सर्व नियमांची पूर्तता करून प्रस्ताव सादर केला जातो अशी माहिती वसंतराव मुंडे चेअरमन श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी पत्रकारांना दिली आहे परंतु बीड जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात नियम भाय विमा उतरल्यामुळे शासनाच्या निदर्शनास आले आहे क्षेत्र वाढ पिक पेरा खोटा दर्शविल्यामुळे लाखो शेतकरी महाराष्ट्रात शासनाच्या व कंपनीच्या तपासणी उघडकीस आले आहेत त्यामुळे प्रमाणिक शेतकऱ्यावर अन्य होते करिता शासनाने बीड जिल्हा सह दहा जिल्ह्याला या योजनेत पिक विमा निविदा घेण्यासाठी खाजगी कंपनी पुढे आले नाहीत त्यामुळे खूप मोठे संकट उभे राहिले करिता दिनांक 5 /12/2019 ला मा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विशेष बाब म्हणून दहा जिल्ह्यासह विमा भरण्यासाठी स्वतंत्र योजना राबविण्यास संदर्भात निवेदन दिले आहे करिता बीड जिल्ह्यासाठी विशेष स्वतंत्र कारवाई करण्याची विनंती केली आहे अशी माहिती काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी पत्रकारांना दिली आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.