सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव नगर पंचायतीने जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील मुक्या रस्त्यावर गटार खोडून ठेवल्याने शाळेत शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना हि गटार अडसर ठरत आहे.या नालीचे तातडीने काम पूर्ण करण्याचे लेखी निवेदन शालेय व्यवस्थापन अध्यक्ष योगेश नागपुरे यांनी देवूनही याकडे नगर पंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप योगेश नागपुरे यांनी केला आहे.
शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर नालीचे खोदकाम करण्यासाठी गटारीचे खोदकाम करण्यात आले आहे.हे काम अपूर्ण अवस्थेत असून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना अडसर ठरत आहे.शालेय प्रशासनाला पालकांनी अनेकदा लेखी तक्रारी करूनही यावर उपाय योजना होत नसल्याने नळीत पडण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.संबंधित मुख्याधिकारी याकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत असल्याचे योगेश नागपुरे यांनी सांगितले.