पाटोदा:शेख महेशर― पाटोदा येथील नवनिर्माण प्राथमिक शाळा लाल हनुमान मंदीर क्रांतीनगर या ठिकाणी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
या वेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. या वेळी रामदास भाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम गुंड रुचिता, द्वितीय जय मुसळे, तृतीय ओमराजे नागरगोजे, व पाचवी ते सातवी गटामध्ये प्रथम सय्यद साद, द्वितीय वेदांत स्वामी, या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देण्यात आले. या वेळी शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख, दलित मित्र एकबाल पेंटर, शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई विष्णुपंत घोलप, डॉ.रविंद्र गोरे,सय्यद सज्जाद इत्यादी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.या वेळी राजाभाऊ देशमुख यांचा वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक नईम पठाण (सर) यांचा उत्कृष्ट उपक्रमशिल शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला. या वेळी उपस्थित जायभाये सर, विजयाताई जायभाये, श्रीमती भोसले मॅडम, सानप मॅडम, बडे मॅडम, मस्के मॅडम, भोसले सर, गाढवे सर, बोराडे सर, डोके सर, मोरे सर, प्रकाश सोनवणे इत्यादी शिक्षका सह इतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या लक्ष्मण सस्ते सामाजिक कार्यकर्ते, विजय जाधव, इत्यादी सह वरील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठाण सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्ता देशमाने माणुसकीची भिंत संयोजक यांनी मानले. या वेळी परीक्षक म्हणून दत्ता वाघमारे यांनी उत्कृष्ट काम पाहिले.