पाटोदा:गणेश शेवाळे―पाटोदा तालुक्यातुन जात असलेल्या एन एच 55 मंजूर राष्ट्रीय महामार्ग आहे माञ यारस्त्याचे काम सुरू झाले नाही पहिल्या रस्त्या होऊन खुप वर्षे झाले यामुळे या रस्त्यावर नुसते खड्डेच खड्डे होते यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठा ञास सहन करावा लागत होता खड्डामुळे छोटे मोठे आपघात सतत होते यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता फुंदे यांनी पाठपुरावा करून तांबारराजुरी ते सौताडा हद्दीपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निधी मंजूर करून आणला असुन या रस्त्या वरिल खड्डे भुजवण्याचे काम चालू झाले असुन अभियांता फुंदे स्वतः रस्त्यावर उभे राहून काम चांगले करून घेत आहेत यामुळे Nh 55 मंजूर राष्ट्रीय महामार्ग या रस्त्याची लवकरच दुर्दशा मिटणार आहे या मुळे या रस्त्यावरून दररोज प्रवास करणारे प्रवासी खुश झाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागात आभियंता म्हणून फुंदे आल्या पासुन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग हद्दीतील बहुतांश सर्व रस्ते खड्डे मुक्त केले असुन तालुक्यातील रस्त्यांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अभियंता फुंदे है सतत धडपड करत असतात.