बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमाजळगाव तालुका

बीड: माजलगाव शहरांमध्ये संशयास्पद अर्धवट जळालेले मानवी शरीर आढळले

माजलगाव दि.०९:आठवडा विशेष टीम― शहरातील अशोक नगर, इंदिरानगर फातिमानगर भागातून वाहत असलेल्या नाल्याच्या कडेला अर्धवट जळालेला मानवी सांगाडा सो. दि. 9 रोजी सकाळी आढळून आला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली असून यातून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    माजलगाव शहरातील अशोक नगर इंदिरानगर ,फातिमा नगर या भागातून वाहत असलेल्या मोठ्या नाल्या लगत अंदाजे पंधरा-सोळा वर्षाच्या वयाचा मानवी सांगाडा अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळून आला.सदरील भागात घाण असल्याने याठिकाणी ती घाण पालिकेकडून पेटवण्यात आले असल्याची जाणवत होते.परंतु त्यातून कातडी जळण्याचा दर्प आल्याने परिसरातील नागरिकांना याठिकाणी काहीतरी वेगळी घटना घडल्याचा संशय सकाळी 11 वाजता आला. काही सुज्ञ नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली.मध्यरात्री केव्हातरी हे कृत्य केल्याचा परिसरातील नागरिकांची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून सदरील घटनेमागे घातपाताचा संशय असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली आहेत. दरम्यान वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.