औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― आज धनगर समाज क्रांती मोर्चा च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे धनगर समाजाच्या महिलेवर अत्याचार करून जीवे मारण्याच्या प्रकरणासंदर्भात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 06 डिसेंबर 019 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका मधील खेर्डा या गावातील धनगर समाजाच्या 55 वर्षीय लिलाबाई खरात या वयोवृद्ध अपंग महिलेवर अत्याचार करून दिला जीवे मारले,ही अतिशय निंदनीय घटना आहे,या घटनेचा आम्ही धनगर समाज क्रांती मोर्चा च्या वतीने जाहीर निषेध करतो व एका गरीब कुटुंबातील महिलेवर बलात्कार करून जीवे मारणाऱ्या नराधमांवर शासनाच्या वतीने कठोर कारवाई व्हावी व यापुढे आशा घटना घडू नये, यासाठी पोलीस विभागाच्या वतींने ठोस कारवाई करावी अशी मागणी धनगर समाज क्रांती मोर्चा च्या वतीने करीत आहोत तसेच धनगर मेंढपाळास शास्त्र परवाना देण्यात यावा जेणे करून त्यांच्यावरती अन्याय होणार नाही ,या साठी शासनाने योग्य निर्णय घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी चे निवेदन धनगर समाज क्रांती मोर्चा चे मुख्य निमंत्रक डॉ. संदिप घुगरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निदेवन दिले या वेळी युवा संघटक शिवाजी नेमाने, ओबीसी नेते विष्णू वखरे ,कम्युनिस्ट नेते कॉ.मधुकर खिल्लारे,दादासाहेब नजन, भटके विमुक्त समाज चे तुकाराम महाराज शिंदे, सुनील क्षीरसागर, दीपक महानवर,भीमराव शेळके,गजानन काळे, निविणकुमार जिजारे, इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.